आंतरराष्ट्रीय योग दिन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व न्यू इंग्लिश स्कूल शाळेत साजरा
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. त्याचेच औचित्य साधत न्यू इंग्लिश स्कूल शाळेमध्ये आर्ट ऑफ लिविंगचे योग प्रशिक्षक महेश पटारे आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये श्रीकृष्ण शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली ५५० विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
योग ही आपल्या देशाची प्राचीन परंपरा आहे. हीच प्राचीन परंपरा नविन पिढीला निरोगी ठेवण्यास उपयुक्त ठरेल म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली जगभरात २१ जुन आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावेळी शाळेतील शिक्षक वृंदानी आंतरराष्ट्रीय योग दिनाचा आनंद घेतला.
योग दिन यशस्वी करण्याकरीता जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मुंतोडे तसेच न्यू इंग्लिश स्कूल शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर नाईक व शिक्षक वृंद यांनी अथक परिश्रम घेतले.