दिव्यांगांना युनिक आयडी कार्डवर सवलत द्या – मधुकर घाडगे
राहुरी – केंद्र शासन निर्णय युनिक कार्ड जि.आर. तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या परिपत्रकानुसार दिव्यांगांना युनिक कार्ड वर 75% सवलत देण्यात यावी, अशी मागणी प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने श्रीरामपुर एसटी डेपो आगार प्रमुखांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, दि.13 जुन 2023 रोजी सकाळी 7:22 वाजण्याच्या दरम्यान राहुरी फॅक्टरी येथील 53% दिव्यांग किशोर नागले हे एसटी बस क्र. MH 40 AQ6003 या श्रीरामपुर ते नाशिक एसटी बसने प्रवास करत आसताना महिला कंडक्टर ने 53% दिव्यांग असुन देखील केंद्र शासनाने दिलेले युनिक कार्ड दाखवुन देखील 75% सवलत दिली नाही.
यावेळी आरे रावीची भाषा वापरून दिव्यांग बाधवाचा अपमान करत फुल टिकिट घेण्यास भाग पाडले. अशा प्रकारे बर्याच दिव्यांगावर अन्याय होत आहे. यापुढे असे अन्याय होऊ नये याबाबत श्रीरामपुर आगार प्रमुख यांच्याशी चर्चा करून मागणी करण्यात आली. या वेळी आगार प्रमुख यांनी आश्वासन दिले की, या पुढे असे प्रकार घडणार नाही. योग्य ती कारवाई करण्यात येईल.
यावेळी निवेदन देताना प्रहार दिव्यांग संघटना उत्तर नगर जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे, जिल्हा सल्लागार सलीमभाई शेख, देवळाली प्रवरा शहर सचिव सुखदेव कीर्तने, किशोर नागले, श्रीरामपुर तालुका अध्यक्ष सचिन क्षिरसागर, महिला अध्यक्षा मायाताई इंगळे, श्रीरामपुर शहराध्यक्ष अमोल झांबरे, नेवासा शहराध्यक्ष जयंत मापारी, सागर सावंतरकर, गणेश बनसोडे, सोमनाथ हरकल आदि उपस्थित होते.