शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीजपुरवठा करा – प्रहारची मागणी
शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे महावितरणने दुर्लक्ष केल्यास विद्युत वाहकतार पकडून आंदोलनाचा इशारा
नगर – जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज पुरवठा करण्याबरोबरच नादुरुस्त विद्युत रोहित्र, तिरपे झालेले पोल व लोंबकळत असलेल्या विज तारेच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनाला सामोरे जाण्याचा इशारा महावितरण कंपनीला प्रहारने दिला आहे.
ऋतुमानात होणाऱ्या बदलांमुळे शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. शेतकरी वर्गाला दिवसा १२ तास वीज देण्यात यावी जेणेकरून शेतकरी वर्गाला शेतीची मशागत करताना कुठल्याही अडचणीला सामोरे जावे लागणार नाही तसेच महावितरण यंत्रणे मार्फत नादुरुस्त झालेले ट्रान्सफार्मर दुरुस्ती करण्यास टाळाटाळ केले जाते, 48 तासाच्या आता महावितरणच्या यंत्रणेने हे संबंधित ट्रान्सफार्मर दुरुस्त करणे हे बंधनकारक आहे.
परंतु महावितरणची यंत्रणा शेतकऱ्यांच्या प्रश्नांना गांभीर्याने घेत नाही, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ज्या ठिकाणी विद्युतवाहक तारा तसेच पोल वाकले आहे. संबंधित प्रकरणाकडे देखील गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा प्रहार स्टाईलने येत्या सोमवार दि. ५ जून रोजी महावितरण कार्यालयासमोर मोठे जनआंदोलन छेडू या आंदोलनादरम्यान चालू विद्युत वाहक तारेला पकडून आंदोलन करू असा इशारा निवेदनाद्वारे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोदसिंग परदेशी यांनी दिला आहे. सदर मागणीचे निवेदन आज महावितरण कार्यालयात अधीक्षक अभियंता प्रकाश खांडेकर यांना देण्यात आले.
यावेळी जिल्हा संघटक तुकाराम शिंगटे, जिल्हा समन्वयक विजय भंडारे, राहुरी तालुकाध्यक्ष सुरेश लांबे, नगर तालुकाध्यक्ष भगवान भोगडे, ऋषिकेश शिरोळे, कर्जत तालुकाध्यक्ष सुदाम निकत, शेवगाव तालुकाध्यक्ष रामभाऊ शिदौरे, जामखेड तालुकाध्यक्ष जयसिंग उगले, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष सुरेश सुपेकर, पाथर्डी तालुकाध्यक्ष मुकुंद आंधळे, नानासाहेब पारधे, प्रवीण पिंपळे तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.