धार्मिक

हरेगांव येथे बुद्ध जयंती उत्साहात साजरी

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील हरेगांव येथे भारतीय बौद्ध महासभा, ग्राम शाखा, समता सैनिक दल व हरेगांव बुद्धविहार ट्रस्ट यांच्या वतीने तथागत गौतम बुद्ध यांची २५६७ वी बुद्ध जयंती साजरी करण्यात आली.

प्रारंभी बौद्धाचार्य अशोक बनकर यांच्या हस्ते पंचशिल ध्वजारोहन करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब शिंदे यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचे पुजन करण्यात आले. संतोष बनसोडे यांनी धम्म देसना दिली तर दिपक नवगिरे यांनी बुद्ध वंदना घेतली.

यावेळी करण ससाणे, सचिन गुजर, बाबासाहेब दिघे, सुनिल शिणगारे, आरोग्य मित्र भिमराज बागुल, सी.एस. खरात, डि.एस.सुर्यवंशी यांनी उपासक उपासीकांना बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. कु .विद्या धनेश्वर हिने बुद्ध पोर्णिमेचे महत्व सांगितले. सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पासून बुद्धविहार पर्यंत भव्य धम्म रॅली काढण्यात आली. त्यानंतर बौद्ध विहारात खिरदान देण्यात आले.

यावेळी विठ्ठल महाले, जनार्दन दुशिंग, ग्रा.पं.सदस्य रमेश भालेराव, सुर्यकांत चाबुकस्वार, अतुल भालेराव, किरण महाले, आकाश सुर्यवंशी, संजय महाले, अशोक गढवे, संदिप लोखंडे, राहुल पंडित, सिद्धार्थ बागुल, स्वप्नील पंडित, रावसाहेब गायकवाड, सिताबाई गायकवाड, नंदाबाई बनसोडे, महाले ताई, गढवे बाई आदि महिला उपासीका, उपासक, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button