शिर्डी संस्थानचे पी शिवा शंकर नवे मुख्य कार्यकारी अधिकारी

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : पी शिवा शंकर यांची प्रख्यात श्री साईबाबा संस्थान शिर्डी येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. सतत शासनाकडे आयएएस अधिकारी यांची नियुक्ती व्हावी अशी मागणी होती. पी शिवाशंकर हे सन २०११ च्या बेचचे आयएएस अधिकारी असून सध्या ते नागपूर येथे वस्त्रोद्योग संचालक म्हणून कार्यरत होते. त्यापूर्वी त्यांनी सोलापूर महापालिकेचे आयुक्त पदावर होते. त्यावेळी स्मार्ट सिटी योजनेत चेहरा मोहरा बदलण्यासाठी प्रयत्न केले.
त्याचप्रमाणे डॉ. नितीनकुमार यांची एसीएस फायनान्स मंतरली मुंबई येथे नियुक्ती, मिलिंद म्हैसकर यांची सार्वजनिक आरोग्य सेवा मुंबई येथे नियुक्ती, डी टी वाघमारे यांची पीएस गृह खाते मंत्रालय मुंबई येथे नियुक्ती, डॉ संजीव कुमार यांची सीएमडी महाट्रान्सको मुंबई येथे नियुक्ती, श्रावण हर्डीकर यांची मुंबई येथे एएमसी, बीएमसी, नियुक्ती, सतत लोकप्रिय व शिस्तीचे तुकाराम मुंढे यांची सचिव एडी, ॲग्री व एडीएफ खाते महाराष्ट्र, मुंबई येथे नियुक्ती, जी श्रीकांत यांची एमसी, छत्रपती संभाजीनगर एमसी येथे नियुक्ती, डॉ. अभिजित चौधरी यांची जॉईनट कमिशनर, स्टेट टक्स, छत्रपती संभाजीनगर येथे नियुक्ती करण्यात आली आहे.