धार्मिक

पेमगिरीचे ग्रामदैवत पेमादेवी मातेचा आज यात्रोत्सव

संगमनेर | बाळासाहेब भोर : ऐतिहासिक व नैसर्गिक वारसा लाभलेल्या व असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तालुक्यातील पश्चिम भागातील पेमगिरीतील पेमादेवी मातेचा यात्रोत्सव दि. 24 व 25 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.

वैशाख महिन्यातील पहिल्या मंगळवारी दरवर्षी ही यात्रा भरते. सालाबादप्रमाणे यावर्षीही ऐतिहासिक शहागडावर सकाळी अभिषेक व महापूजा व तदनंतर संपूर्ण गावातून शहागडापर्यंत देवीच्या काठीची मिरवणूक होईल. संध्याकाळी महाराष्ट्राची पारंपरिक लोककला असलेला लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होईल व बुधवारी दुपारी कुस्त्यांचा जंगी हंगामा होणार आहे.

छत्रपती शहाजी राजे व राजमाता जिजामाता यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शहागडावरील हा पेमादेवी मातेचा यात्रोत्सव संपूर्ण परिसरातील भाविकांसाठी मोठी पर्वणीच असते. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला ऐतिहासिक शहागड, गडावर विराजमान पेमादेवी मातेचा यात्रा उत्सव यावर्षीही मोठ्या भव्य दिव्य स्वरूपात संपन्न होणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या यात्रोत्सवात सहभागी व्हावे अशी नम्र विनंती समस्त ग्रामस्थ पेमगिरीकरांच्या वतीने करण्यात आली आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button