लोणी येथे ‘ग्राम संघर्ष समिती’ ची स्थापना
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली व पश्चिम भारत संघटक सुभाषराव पोखरकर यांच्या नेतृत्वाखाली लोणी खु. ता.राहाता येथे राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने ‘ग्राम संघर्ष समिती’ ची स्थापना करुन फलक अनावरण जिल्हाध्यक्ष संपतराव समिंदर यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी भगवंत वाळके, दशरथ पवार, अशोक देशमुख यांनी विचार व्यक्त केले. सुभाष पोखरकर यांनी पेन्शन वाढीबाबत कमांडर अशोकराव राऊत यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेले प्रयत्न, पेन्शन धारकांच्या विविध अडीअडचणी, दिल्ली येथे दि. २० एप्रिल २०२३ रोजी झालेली लेबर कमिटी बैठक व कमांडर साहेबांनी मांडलेले मुद्दे याबाबत विचार मांडले.
या कार्यक्रमाचे नियोजन सुकदेव आहेर पाटील, रायभान तुपे, जी.के. चिंतामणी, बशीर बेग, सुरेश कटारिया यांनी उत्तम प्रकारे केले होते.