अहमदनगर
अग्निपंख फाउंडेशनच्या वतीने डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची संयुक्त जयंती निमित्त व शिक्षण विषयक विचारांच्या प्रेरणेतून तसेच अग्निपंख फाउंडेशनचे अध्यक्ष प्रमोद जाधव यांच्या भगिनी स्व.सिस्टर ख्रिस्तीना जाधव यांच्या स्मरणार्थ यावर्षीही उंदीरगाव-हरेगाव पंचक्रोशीतील वाडी-वस्तीवर समाजातील गरजू विद्यार्थी व विद्यार्थिनींना चालू शैक्षणिक वर्षाकरिता वही वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यासाठी लोकनियुक्त सरपंच सुभाष बोधक, सागर दुशिंग व रायझिंग फ्रेंड्स सर्कल ग्रुप आनंदनगर यांचे विशेष सहकार्य लाभले.