अहिल्यानगर
नामदार थोरात यांना हुबेहूब रेखाचित्र भेट
महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी हुबेहूब चित्ररेखा प्रतिमेचा स्वीकार करून शर्वरी पवार हिचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.
आरडगांव प्रतिनिधी / राजेंद्र आढाव : श्रीरामपूर तालुक्यातील सरला बेट येथे १७४ सप्ताह ध्वजारोहन कार्यक्रम प्रसंगी राहुरी तालुक्यातील खुडसरगाव येथील युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस शरद पवार यांची कन्या कु. शर्वरी पवार हिने काँग्रेस नेते महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांचे हुबेहूब रेखाटलेले चित्र भेट प्रदान करण्यात आले.या प्रसंगी सरला बेट संस्थानचे मठाधिपती गुरुवर्य मंहत रामगिरीजी महाराज, उपनगराध्यक्ष करण ससाने, आमदार लहू कानडे, सुभाष सांगळे, कैलास रेवाळे आदी मान्यवर व भाविक भक्त उपस्थित होते.