अहिल्यानगर

सामाजिक न्याय समता पर्व अंतर्गत बार्टी मार्फत निरंतर वाचन उपक्रम

राहुरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या समता दुत प्रकल्प, अहमदनगर याच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त १ एप्रिल ते १ मे २०२३ या कालावधीत सामाजिक न्याय समता पर्व राबविण्यात येत आहे.

या उपक्रमात जिल्ह्यात निरंतन वाचन उपक्रम, व्याख्यान, चर्चासत्र, नवउद्योजक कार्यशाळा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर, निबंध, रांगोळी, चित्रकला, वकृत्व स्पर्धा, सामाजिक न्याय विभाग योजनेचा वस्ती पातळीवर प्रचार प्रसार, युवा गट कार्यशाळा, संविधान जनजागृती, विविध शिबिरे, इत्यादी उपक्रमातून जयंती साजरी केली जात आहे.

सावित्रीबाई फुले विद्यालय व ज्युनिअर कॉलेज आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने निरंतन वाचन उपक्रमाचे आयोजन विद्यालयात करण्यात आले होते. यामध्ये एकुण 37 विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमासाठी बार्टीचे प्रकल्प अधिकारी दिलावर सय्यद, मुख्याध्यापिका धनवटे मॅडम, उपमुख्याध्यापक अरूण तुपविहीरे तसेच शाळेतील शिक्षक उपस्थित होते.

बार्टीचे समतादूत एजाज पिरजादे यांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. बार्टी संस्थेचे सचिव सुमंत भांगे, बार्टी संस्थेचे महासंचालक वारे सर, निबंधक श्रीमती इंदिरा अस्वार, बार्टी संस्थेचे विभाग प्रमुख डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात विविध उपक्रम समतादुत राबवीत आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button