कृषी

राहीबाईंचे देशी बियाणांचे ज्ञान कृषी विभागाने जनतेपर्यंत पोहचवावे – सिध्दाराम सालीमठ

कोंभाळणे येथील बीज बँकेला जिल्हाधिकाऱ्यांची भेट

शिर्डी – कोंभाळणे येथे पद्मश्री बीजमाता राहीबाई सोमा पोपेरे यांच्या मार्गदर्शनाने उभ्या राहिलेल्या देशातील पहिल्या देशी बियाणे बँकेला अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी भेट दिली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत या विषयाचे ज्ञान पोहोचले पाहिजे यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.

यावेळी संगमनेर प्रांतधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे हेही उपस्थित होते. देशी बियांच्या संवर्धनासाठी देश आणि विदेशात प्रसिद्ध असलेल्या बीजमाता राहीबाई सोमा पोपेरे यांची भेट घेऊन या विषयाची सविस्तर माहिती यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतली.

टराहीबाई यांचे पारंपरिक बियाणे संवर्धनातील ज्ञान व अभ्यास बघून त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. राहीबाई पोपेरे यांनी जतन केलेल्या विविध वाणांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना करून दिली. त्यांच्या संग्रही असलेले भाजीपाला बियांचे संच यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेट दिले. राहीबाई करत असलेल्या कार्याची माहिती यावेळेस जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतली.

अहमदनगर जिल्ह्यातील आदिवासी अतिदुर्गम भागात अशा पद्धतीचे काम उभे राहिल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. राहीबाई यांनी जतन केलेल्या विविध गावरान वाणांची तंत्रशुद्ध माहिती आपणास प्रेरणा देऊन गेली. अहमदनगर जिल्ह्यात काम करताना या ज्ञानाचा उपयोग होणार असल्याचे गौरवोद्गार‌ जिल्हाधिकारी श्री.सालीमठ यांनी यावेळी काढले.

देश- विदेशात प्रसिद्ध असलेली ह्या बीज बॅंक उभारणीस महाराष्ट्र शासनाचे अर्थसहाय्य लाभले आहे. तांत्रिक सहाय्य व मार्गदर्शन बायफ संस्थेद्वारे करण्यात आले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button