पिंप्री अवघड शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
राहुरी : तालुक्यातील पिंप्री अवघड येथे बुधवार दि. 29 मार्च 2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या कार्यक्रमात इयत्ता 1 ली ते 7 पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने भारावून गेलेल्या पालक व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवून विद्यार्थ्यांवर बक्षीसांचा वर्षाव केला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर, धार्मिक, विनोदी गीतांवर बहारदार नृत्य सादर केले. तसेच आदर्श विद्यार्थी तुषार कैलास पवार व श्रृती अनिल लांबे यांना गट शिक्षणाधिकारी गोरक्षनाथ नजन, उद्योजक सुनिल बनकर व सुरेशराव लांबे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष तथा पिंप्री अवघड गावचे माजी सरपंच सुरेशराव लांबे हे होते. या कार्यक्रमास प्रमूख पाहुणे म्हणून अहमदनगरचे उद्योजक सुनिल बनकर, जिल्हा नियोजन समितीच्या माजी सदस्या वैशालीताई नान्नोर, सहाय्यक पोलीस निरीक्षक चांगदेव कांबळे, गटशिक्षणाधिकारी गोरक्षनाथ नजन, विस्तार अधिकारी अर्जूनराव गारूडकर, विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविणारे सडे केंद्राचे केंद्र प्रमुख रविंद्र थोरात, पिंप्री अवघड गावच्या विद्यमान सरपंच परवीनबानो बादशाह शेख, उपसरपंच लहानू तमनर, पिंप्री अवघड सोसायटीचे चेअरमन मच्छिंद्र लांबे, व्हाईस चेअरमन पवार, माजी सरपंच अनिल दोंड, बापूसाहेब पटारे, भाऊसाहेब गटकळ, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष आफसाना युनूसभाई शेख, माजी अध्यक्ष पोपट शेंडगे, जालिंदर पवार, तसेच तालुक्यातील व जिल्हातील बहुसंख्य शिक्षक यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक बबन कुलट, शाळेतील सर्व शिक्षक तसेच गोटुंबा आखाडा शाळेतील अनिता मोरे यांनी विशेष मदत केली. विद्यार्थ्यांना नृत्य शिकविण्यासाठी कु. भाग्यश्री बोर्डे, छाया पानसरे व संगिता बेदरे, गंगाधर जवरे, बबन गाडेकर यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक बबन कुलट यांनी तर सूत्रसंचालन अनिल कल्हापुरे, शिवाजी नवाळे, व अनिल पवार यांनी आभार मानले.