ठळक बातम्या
कलावंतांचे मानधन व जिल्हानिहाय मर्यादा वाढवावी – विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली मागणी
मुंबई – राज्यातील कलावंतांचे मानधन व जिल्हानिहाय मर्यादा वाढविण्यात यावी, याकडे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहाचे लक्ष वेधत यासाठी सरकारने व्यापक धोरण राबविण्याची मागणी केली आहे.
राज्यातील वेगवेगळे क्षेत्रातील कलावंत यांचे मानधन अतिशय मर्यादित प्रमाणात असून या कलावंतांना जिल्हास्तरावर, राज्य स्तरावर मानधन दिले जाते. यासाठी जिल्हा निहाय एक मर्यादा दिली आहे. ही मर्यादा जिल्ह्याला १०० इतकी आहे. काही जिल्ह्यांची लोकसंख्या ही अधिक तर काहींची कमी आहे. लोकसंख्येनुसार किंवा उद्दिष्टानुसार मर्यादेत वाढ करावी, अशी मागणी दानवे यांनी केली.
कलावंतांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे त्यांचे मानधन वाढविणे व मर्यादा वाढविण्याबाबत आमूलाग्र बदल करून परिवर्तन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यासाठी अभ्यास करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. कलावंतांची मर्यादा ही मर्यादित न ठेवता तर्कांवर आधारित त्यात बदल केले जातील, अशी माहिती सरकारकडून देण्यात आली.