अहिल्यानगर
शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हिवाळेंचा क्रांतीसेनेने केला सत्कार
राहुरी/ प्रतिनिधी : तालुक्यातील मॉडेल स्कुल म्हणुन नावलौकिक असलेल्या कोंढवड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते सुनील हिवाळे यांची निवड झाल्याबद्दल अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी सुनील हिवाळे यांचा कोंढवड गावचे माजी उपसरपंच इंद्रभान म्हसे व अखिल भारतीय क्रांतीसेना पक्षाचे उपाध्यक्ष गोरक्षनाथ माळवदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी क्रांतीसेनेचे प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष संदीप ओहोळ, डिग्रस ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर भिंगारदे, सुनील काचोळे, ग्रामपंचायत सदस्य गोरक्षनाथ देशमुख, भागवत पुंड सर, महेश म्हसे आदी उपस्थित होते.