अहिल्यानगर
15 मार्च रोजी ब्रम्हलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : १५ मार्च रोजी श्रीक्षेत्र गोदावरी धाम बेट सरला बेट येथे ब्रम्हलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज यांची 14 वी पुण्यतिथी साजरी होणार आहे. यावेळी सकाळी 10 वा. महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज यांचे जाहीर हरिकीर्तन होणार आहे. त्यानंतर पुरणपोळी, मांड्याचा महाप्रसाद होईल. या सोहळ्यास सहभागी होण्याचे आवाहन सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज संस्थान सर्व विश्वस्त व्यवस्था, सर्व भक्त परिवार यांनी केले आहे.