अहिल्यानगर
प्रहारचे वतीने देवळाली प्रवरात शिवजयंती साजरी
देवळाली प्रवरा : प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार श्रमिक सेवा संघाच्या वतीने राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवजयंती साजरी करण्यात आली.
प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ क्षेत्राचे अध्यक्ष व प्रहार श्रमिक सेवा संघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढूस, सचिव बाळासाहेब कराळे, देवळाली प्रवरा शहर अध्यक्ष किरण पंडित, राहुरी फॅक्टरी शहर अध्यक्ष शरद वाळुंज, श्रमिक सेवा संघ शहर अध्यक्ष नवनाथ चव्हाण, राहुरी फॅक्टरी शहर उपाध्यक्ष एकनाथ वाणी, गणेश भालके, देवळाली प्रवरा शहर उपअध्यक्ष अशोक देशमुख, संघटक प्रभाकर कांबळे, शाखा अध्यक्ष सचिन साळवे, सनी सोनवणे, एकल महीला पुनर्वसन समितीचे सचिव प्रशांत कराळे, जमशिल शेख यांच्यासह प्रहार चे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.