अहिल्यानगर
प्राचार्य सौ.मंगलताई पाटील यांना साहित्यसेवा गौरव पुरस्कार प्रदान
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्था, टाकळीभानचा साहित्यसेवा गौरव पुरस्कार 89व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते टाकळीभान येथे आयोजित पहिल्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात प्रदान करण्यात आला.
प्राचार्य सौ. मंगलताई पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेत 1976 ते 2010 या 34 वर्षात उंदीरगाव, श्रीरामपूर, सातारा आदी शाखेत शिक्षिका, मुख्याध्यापिका प्राचार्य म्हणून सेवा केली. सध्या त्या सातारा येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शिक्षणोउत्तेजक सहकारी पतपेढी लि.च्या चेअरमन म्हणून कार्यरत आहेत. त्यांची ‘आठवणींचा गुलमोहर ‘, मंगलपर्व,’ आयुष्याच्या वळणावर ‘ ह्या ललितगद्य पुस्तकांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले. टाकळीभान येथील मिळालेल्या राज्यस्यरीय पुरस्काराबद्दल अनेकांनी त्यांचा सन्मान, अभिनंदन केले.
रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने, रयत शिक्षण संस्थेचे उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव, ऑडिटर प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, माजी प्राचार्य टी. ई. शेळके, माजी प्राचार्य शन्करराव अनारसे, डॉ. बाबुराव उपाध्ये, पत्रकार प्रकाश कुलथे, प्रा.शिवाजीराव बारगळ, संस्थेचे अर्जुन राऊत, सूत्रसंचालक संगीता फासाटे, प्रा.डॉ. बाबासाहेब शेंडगे आदिंनी अभिनंदन केले.