अहिल्यानगर
उंदिरगाव येथे शिवजयंती साजरी
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील उंदीरगाव येथे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालय उंदिरगाव या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला ज्येष्ठ अशोकराव गलांडे, रेवजी भालदंड, सरपंच सुभाष बोधक, उपसरपंच रमेश गायके व ग्रामविकास अधिकारी शरद वावीकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संचालक विरेश गलांडेे, संचालक राजेंद्र पाऊलबुद्धे, चित्रसेन गलांडेे, दिलीपराव गलांडे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश ताके, बाळासाहेब निपुंगे, अमोल नाईक, सुभाष पंडित, गणेश ठाणगेे, रामचंद्र आव्हाड, डी वाय शिंदे, अजित नाईक, मनोज बोडके, रवी पंडित, रामचंद्र आव्हाड, संजय काळेे, उमेश दिवे, शोयब शेख, रामदास फुलवर, संजय सोमवंशी आदींंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनेे उपस्थित होते.