अहिल्यानगर
दहावीच्या परीक्षेबरोबरच जीवनातील परीक्षांनाही आत्मविश्वासाने सामोरे जा-सुलोचनाताई पटारे
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : खा.गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल निमगांव खैरी विद्यालयात मार्च २०२३ मध्ये प्रविष्ठ होणाऱ्या इ.१० वी च्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा नुकताच संपन्न झाला, त्यावेळी प्रमुख अतिथी माजी गटशिक्षणाधिकारी सुलोचनाताई पटारे बोलत होत्या.
शिक्षकांनी तुंम्हाला गेली दहा वर्षे अविरतपणे अध्यापन केलेले आहे. त्याच जोरावर आपण अभ्यासामध्ये सातत्य ठेवुन दहावीच्या परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जावे असे सांगितले. येणाऱ्या काळात नवीन शैक्षणिक धोरणाला आपणा सर्वांना सामोरे जायचे आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मनातील न्यूनगंड बाजुला ठेवला तर यश निश्चित मिळते. १९९५ च्या बॅचचे जवळपास ३५ अधिकाऱ्यांचा आमचा ग्रुप आहे. येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन, ऑफलाईन मार्गदर्शन करण्याचा आमचा मानस असल्याचे प्रमुख अतिथी सुलोचनाताई पटारे यांनी सांगितले.
यावेळी विद्यालयातील एनएमएमएस परीक्षेला पात्र झालेल्या कु.ईश्वरी भिकाजी जाधव व कु.स्वाती नितीन घोरपडे या विद्यार्थिनींचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यालयाचे मुख्याध्यापक वासुदेव गायके यांनी पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक केले. दहावीच्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करतांना चांगले यश संपादन करून शाळेचे व गावाचे नाव उज्ज्वल करण्याचा मानस व्यक्त केला. तसेच शाळेसाठी दैनंदिन परीपाठासाठी चांगली साऊंड सिस्टीम भेट दिली. इ.९ वी च्या विद्यार्थ्यांनी सर्वांसाठी मिष्ठान्न भोजनाची व्यवस्था केली. उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ.स्वप्निल पुरनाळे यांनी इ.१० वी च्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आरोग्य टिप्स दिल्या.
याप्रसंगी आरोग्यमित्र सुभाष गायकवाड, लहानुभाऊ शेजुळ, अरूण काळे, चंद्रभान वाघ, दत्तात्रय गमे, पंढरीनाथ झुराळे, दिनेश सोमोसे, गोविंदराव वाघ, राजेंद्र शेजुळ, बाळासाहेब निमसे, आहेर इ.पालक उपस्थित होते. अध्यक्ष निवड व सर्वांचे आभार शंकरराव शेलमकर, अनुमोदन अर्जन देवकर व सुत्रसंचलन जनार्दन ठुबे यांनी केले. यावेळी विद्यालयातील बाळासाहेब बनकर, अशोक कटारे, सुरेश पवार, श्रीम.जया गाडे, मिना गायके, सोफिया शिंदे, झुराळे, रवी गायकवाड, बाळासाहेब भोरकडे, मच्छिंद्र थोरात आदिंनी परीश्रम घेतले.