शिक्षणवारी ज्ञान पंढरी
मांजरी येथील बिडगर वस्ती शाळेत पालक मेळावा उत्साहात संपन्न
मांजरी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिडगर वस्ती मांजरी येथे माता पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त शाळेत संगीत खुर्ची, उखाणे स्पर्धा घेऊन प्रथम व द्वितीय क्रमांक आलेल्या महिलांना बक्षिसे वाटप करण्यात आली.
यावेळी सौ. कर्जुले मॅडम यांनी निपुण भारत अभियान, मुलांच्या आरोग्याची काळजी, योगासने व प्राणायाम याविषयी माहिती सांगितली. यावेळी सर्व महिलांना हळदीकुंकू देऊन पेन वाटप केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री. आरेवाड यांनी केले व आभार श्री.हापसे यांनी केले. बिडगर वस्ती येथील शाळेच्या कार्यक्रमात महिलांचा उस्फुर्त सहभाग होता व महिलांनी संगीत खुर्ची स्पर्धेत भाग घेऊन मनसोक्त आनंद घेतला.