निधन वार्ता
शिवसेना तालुका प्रमुख विजय ढोकणे यांचे निधन
राहुरी शहर | अशोक मंडलिक : शिवसेना तालुका प्रमुख विजय बाबुराव ढोकणे वय ४० यांचे काल अल्पशा आजाराने निधन झाले असून त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ व बहिणी असा मोठा परिवार आहे. विजय ढोकणे हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे असल्यामुळे त्यांचा मोठा मित्र परिवार होता.
राहुरी तालुक्यातील राजकारणामध्ये विजय ढोकणे यांचा मोठा दबदबा होता. उंबरे विविध सोसायटीचे सलग दोन वेळा ते अध्यक्ष होते. तसेच इतरही संस्थेमध्ये त्यांचा सहभाग होता. गावातील राजकारणा बरोबरच तालुक्यातही त्यांना मानणारा मोठा वर्ग होता. कुठलिही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही आपल्या मेहनतीच्या जोरावर व प्रेमळ स्वभावामुळे सर्वांचे ते लाडके झाले होते. त्यांच्या जाण्याने उंबरे गावासह राहुरी तालुक्यामध्ये एक न भरणारी पोकळी निर्माण झाली आहे. कै. विजय ढोकणे यांना श्रद्धांजली वाहण्याकरिता शिवसेना जिल्हा प्रमुख पै. रावसाहेब खेवरे, बा.बा. तनपुरे कारखान्याचे चेअरमन नामदेवराव ढोकणे, कारखान्याची मा.संचालक सुनील आरसुरे, सचिन म्हसे तसेच गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, सोसायटीचे चेअरमन, सदस्य तसेच तालुक्यासह नगर जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.