अहिल्यानगर
मुख्यमंत्री शिंदे यांच्या रूपाने बाळासाहेबांच्या शिवसेनेला निडर सेनापती मिळाले – देवेंद्र लांबे पाटील
राहुरी – महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राहुरी तालुका व शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. सकाळी शहरातील संत गाडगेबाबा आश्रम शाळा येथे विद्यार्थ्यांना फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला. तसेच संत व्यापारी संकुलन येथे बाळासाहेबांची शिवसेना पक्ष कार्यालयाचे उदघाटन उत्तर जिल्हाप्रमुख राजेंद्र देवकर, खा.लोखंडे यांचे स्वीयसहाय्यक शिवाजी दिशागत यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी उपजिल्हा प्रमुख आण्णा पाटील म्हसे, जयवंतराव पवार, अध्यात्मिक आघाडीचे जि.प्र. ह.भ.प.संपत जाधव, राहुरी तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे पाटील, शेतकरी आ.प्र. किशोर मोरे, ता.संघटक अशोक तनपुरे, शहर प्रमुख गंगाधर सांगळे, अविनाश क्षीरसागर आदी उपस्थित होते.
यावेळी लाईफ ईन मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलचे संचालक धनंजय पानसंबळ व ग्रामीण रुग्णालय राहुरी यांच्या सहयोगाने सर्व रोग निदान शिबीर घेण्यात आले. विशेष म्हणजे या दरम्यान विविध प्रकारच्या रक्त तपासणी मोफत करण्यात आल्या. या शिबिरात डोळे तपासणी शिबिरास मोठा प्रतिसाद मिळून आल्याचे दिसून आले. आरोग्य शिबिरात बि.पी., शुगर तपासणी, डोके दुखी, ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, त्वचेचे आजार, पोटाचे विकार, मणक्याचे आजार, गुडघे दुखी, कंबर दुखी, सांधेवात अशा अनेक तपासण्या मोफत करण्यात आल्या. शेकडो नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला. या प्रसंगी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. राहुरी पोष्ट ऑफिस यांच्या वतीने अपघात विमा उतरविण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
राहुरी येथील बाळासाहेबांची शिवसेना पक्ष कार्यालायचे उदघाटन करताना जिल्हा प्रमुख राजेंद्र देवकर, उपजिल्हा प्रमुख आण्णा पाटील म्हसे, राहुरी तालुका प्रमुख देवेंद्र लांबे पाटील आदी.
संत गाडगेबाबा आश्रम शाळा वरवंडी येथिल विद्यार्थ्यांना आध्यत्मिक आघाडी जि.प्रमुख ह.भ.प. संपत जाधव यांच्या वतीने भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी उत्तर नगर जिल्हा प्रमुख देवकर बोलतांना म्हणाले कि, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर नगर जिल्ह्यामध्ये भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन प्रत्येक तालुक्यात करण्यात आले आहे. अनाथांचा नाथ एकनाथ म्हणून ज्यांची ओळख आहेत असे ना. शिंदे साहेब यांच्या आदेशाने व खा.सदाशिव लोखंडे यांच्या सुचनेवरून बाळासाहेबांची शिवसेना सर्व पदाधिकारी समाजाला अपेक्षित असणारे काम करण्यासाठी कटिबद्ध आहेत. राहुरी तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे यांनी कमी वेळात तालुक्यात मोठे नियोजन केले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून तालुक्यात बाळासाहेबांची शिवसेनेची ताकद वाढणार आहे असे चित्र दिसत आहे असे देवकर म्हणाले.
उत्तर नगर जि.संपर्क प्रमुख म्हणाले कि, सर्वसामन्य माणूस जनतेची काम करताकरता राज्याचा जनसेवक म्हणजेच मुख्यमंत्री झालेत. अशाच प्रकारे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने राहुरी तालुक्यात कायम सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नावर लढणारे देवेंद्र लांबे यांना तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. त्या दिलेल्या जबाबदारीचे सोन झाल्याचे आजच्या कार्यक्रमावरून दिसत आहे. या प्रसंगी हा.भ.प.संपत जाधव महाराज म्हणाले कि, संतांच्या शिकवणी प्रमाणे मुख्यमंत्री शिंदे साहेब जनसेवेचे काम करत आहेत. महाराष्ट्राच्या यादीतील पहिले ना. शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत कि जे सर्वसामान्य माणूस भेट घेवून समस्या मांडू शकतो व त्या समस्या सोडविण्यासाठी ते प्रयत्नशील असतात.
कार्यक्रमाचे आयोजक राहुरी तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे पाटील आभार मांडतांना म्हणाले कि, दोन दिवस अगोदर खा. सदाशिव लोखंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त समाज उपयोगी उपक्रम राबविण्याच्या सूचना बैठकीत दिल्या होत्या. त्या आदेशानुसार राहुरी तालुक्यात कमी वेळात जास्त उपक्रम राबविण्यात आलेले आहे. सेनापती निडर व लढवय्या असल्यास सैन्य देखील निधड्या छातीने लढतात. ना. एकनाथ शिंदे यांच्या रूपाने बाळासाहेबांच्या शिवसेनेला निडर सेनापती मिळाले आहेत. त्यामुळे नवे जुने शिवसैनिक एकत्र येत असल्याने तालुक्यात भगवे वादळ निर्माण होत आहे असे देवेंद्र लांबे म्हणाले.
या कार्यक्रमास दक्षिण जिल्हा प्रमुख बाबुशेठ टायरवाले यांनी भेट देवून कार्यक्रमास शुभेच्छ्या दिल्या. या रक्तदान कार्यक्रम प्रसंगी संदीप गिते, अशोक तनपुरे, विक्रम गाढे, प्रभाकर तुपे, दिपक माळी, चंद्रशेखर वाडकर, राजेंद्र लबडे, बाप्पुसाहेब वाडकर, सागर जावळे, शरद गावडे, अशोक गावडे, तात्या येवले, बाळासाहेब पवार, विकास साळवे, राजेंद्र परदेशी, राजेंद्र अढगले, विशाल मकासरे, राजेंद्र मिर्झा, राजेंद्र भागवत, विलास साळवे आदींसह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.