अहिल्यानगर

रविवारी मतमाऊली भक्तीस्थान स्वागत कमान लोकार्पण सोहळा

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : रविवार, दि.19 फेब्रुवारी रोजी सकाळी ८.४५ वा. लोकनेते व अशोक सह. सा.कारखान्याचे चेअरमन भानुदास मुरकुटे यांच्या हस्ते व प्रमुख धर्मगुरू फा. डॉमनिक रोझारीओ यांच्या सौजन्याने संत तेरेसा चर्च व मतमाऊली भक्तिस्थानकाकडे जाणाऱ्या स्वागत कमानीचा लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे.
यावेळी फा.रिचर्ड, फा.सचिन, अशोक कारखान्याचे माजी चेअरमन सुरेश गलांडे पाटील व संचालक विरेश गलांडे पाटील उपस्थित राहणार आहेत. तरी हरेगांव, उंदीरगाव ग्रामस्थांनी स्वागत कमान लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन सर्व धर्मगुरू संत तेरेसा चर्च मत माऊली भक्तीस्थान हरेगाव यांनी केले आहे. ग्रामस्थांची कमान उभारण्याची मागणी चेअरमन भानुदास मुरकुटे यांनी मंजूर केली होती.

Related Articles

Back to top button