अहिल्यानगर

राहुरी येथे शासकीय योजना व उद्योग व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

राहुरी : डाॅ बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे, महिला आर्थिक विकास महामंडळ अहमदनगर व प्रतिभा लोकसंचलित साधन केंद्र राहुरी यांच्या संयुक्त विद्यमानाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त व महिला दिनानिमीत्त शासकीय योजना व उद्योग व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळा चे आयोजन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठान सभागृहात करण्यात आले होते.
यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे माजी व्यवस्थापक विजय यंदे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक संजय गर्जे, जिल्हा उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी तात्यासाहेब जिवडे, साहय्यक प्रकल्प अधिकारी संदीप केदारी, बार्टी चे प्रकल्प अधिकारी दिलावर सय्यद, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठान राहुरी चे अध्यक्ष विजय तमनर, भिमतेज महिला संघटनेच्या अध्यक्षा श्रीमती अनिता म्हस्के, प्रतिभा लोकसंचलित साधन केंद्र राहुरी चे अध्यक्षा श्रीमती पुष्पाताई धनवटे, व्यवस्थापक महेश अबुज  आदि मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले याच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
जिल्हा उद्योजकता विकास केंद्रातर्फे राबविण्यात येणारे विविध प्रशिक्षण तसेच शासनाच्या माध्यमातून अनुदान असणाऱ्या कर्ज योजना बाबत सविस्तर मार्गदर्शन तात्यासाहेब जिवडे यांनी दिली. उद्योग व्यवसाय कसा करावा व लघु उद्योगासाठी महिलांनी पुढे यावे असे आवाहन विजय यंदे यांनी महिलांना केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठान राहुरी चे अध्यक्ष विजय तमनर यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा देत गोरगरीब वंचित महिलांना आरोग्य, शिक्षण तसेच विविध शासकीय योजना मिळवुन देण्यासाठी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सहकार्य करण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे सांगितले. माविम जिल्हा समन्वयक संजय गर्जे यांनी महापुरूषांचे विचारांना घेऊन प्रत्येक महिला सक्षम होऊन बचत गटाच्या माध्यमातून आपला व्यवसाय सुरू करावा असे आव्हान केले.
बार्टीचे अहमदनगर जिल्हा समतादूत प्रकल्प अधिकारी दिलावर सय्यद यांनी बार्टी व समाजकल्याण कार्यालयामार्फत राबविण्यात येणारे विविध योजना, उपक्रम, प्रकल्प विषयी माहिती दिली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बार्टी चे समतादूत पिरजादे एजाज व माविम चे व्यवस्थापक अबुज यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माविम चे सहयोगनी योगिता चुंबलकर, अल्हाट मॅडम, वैशाली ढसाळ, वैशाली खरात, शेख शबनुर आदिंनी नियोजन केले तर आभार माविम चे अध्यक्षा श्रीमती पुष्पाताई धनवटे यांनी केले. यावेळी माविम चे बचत गटातील अध्यक्ष, सचिव व सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Back to top button