अहिल्यानगर
राज्यस्तरीय सिल्लोड कृषि महोत्सवास महसुल मंत्री व कृषि मंत्र्यांची भेट
राहुरी विद्यापीठ : सिल्लोड जि. औरंगाबाद येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय कृषि महोत्सवास महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री तथा अहमदनगर व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील व कृषि मंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी भेट दिली.
यावेळी त्यांनी राज्यातील चारही कृषि विद्यापीठांच्या दालनासह इतर वेगवेगळ्या दालनांना भेट दिली. याप्रसंगी विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे यांनी मंत्री महोदयांना प्रदर्शन दालनातील विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाबद्दल माहिती दिली. यावेळी कास्ट प्रकल्पाच्या ड्रोन फवारणी प्रात्यक्षिकाची पहाणी मंत्री महोदयांनी केली. यावेळी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहुरी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाबद्दल समाधान व्यक्त केले.