अहिल्यानगर
राहुरी कृषि विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच विद्येेचा विद्यादंड महिला अधिकार्याच्या हाती
राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा 36 वा पदवीदान समारंभ दि. 6 जानेवारी, 2023 रोजी पार पडला. कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्या विभागाच्या उपकुलसचिव श्रीमती आशा पाडवी यांना दीक्षांत संचलनाचे प्रमुख करुन त्यांच्या हाती विद्यादेवी श्री सरस्वतीचा विद्यादंड हाती दिला. श्रीमती आशा पाडवी यांनी विद्यादंड हाती घेत अग्रभागी राहुन दीक्षांत संचलनाचे नेतृत्व केले. ही अतिशय अभिमानास्पद अशी घटना सर्वांनी पदवीदान समारंभ कार्यक्रमात अनुभवली. विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच हा मान महिला अधिकार्याला मिळाला आहे.