अहिल्यानगर
क्रांतीसेना महिला आघाडी संघटक पदी मंगलताई म्हसे तर युवती अध्यक्ष पदी प्रियंका पेरणे
ब्राम्हणी प्रभाग अध्यक्ष पदी मंगलताई म्हसे यांच्या निवडी बद्दल सत्कार
राहुरी : अखिल भारतीय क्रांतीसेना महिला आघाडीच्या राहुरी तालुका संघटक पदी मंगलताई सुनिल म्हसे व युवती अध्यक्ष पदी प्रियंका कमलेश पेरणे यांची निवड करण्यात आली. तसेच पंचायत समिती राहुरी येथे नुकत्याच झालेल्या उमेद अभियानाच्या बैठकीत मंगलताई म्हसे यांची प्रेरणा महिला प्रभाग संघ, ब्राह्मणीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार कोंढवड येथे आयोजित करण्यात आला होता.
राहुरी तालुक्यातील कोंढवड येथे अखिल भारतीय क्रांतीसेनेची बैठक प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे, व पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गोरक्षनाथ माळवदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष भारतीताई म्हसे यांच्या हस्ते सदर नियुक्त्या करण्यात आल्या. नुकतीच पंचायत समिती राहुरी येथे उमेद अभियानाच्या बैठकीत मंगलताई म्हसे यांची प्रेरणा महिला प्रभाग संघ, ब्राह्मणीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली होती. त्या कोंढवड येथील राजमाता जिजाऊ महिला ग्रामसंघाच्या सचिव म्हणून कार्यरत आहेत. या निवडीने कोंढवड गावच्या नावलौकिकात भर पडल्याने क्रांतीसेनेच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मधुकर म्हसे यांनी क्रांतीसेनेच्या माध्यमातून करत असलेल्या सामाजिक कार्याची माहिती देऊन महिलांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी क्रांतीसेना महिला आघाडीच्या माध्यमातून महिला संघटन वाढविणे गरजेचे असल्याचे सांगितले.
या कार्यक्रम प्रसंगी बाबासाहेब माळवदे, आण्णासाहेब म्हसे, संदीप म्हसे, रोहीत म्हसे, कमल म्हसे, जिजाबाई म्हसे, गयाबाई हारदे, सीआरपी राधिका म्हसे, वैशाली म्हसे, भारती पवार, जयश्री म्हसे, लता म्हसे, वर्षा म्हसे, शांता म्हसे, सुनिता म्हसे, अलका म्हसे, अश्विनी म्हसे, अनिता म्हसे, सुरेखा म्हसे, छाया म्हसे, शालिनी म्हसे, मनिषा म्हसे आदी उपस्थित होते.