अहिल्यानगर

इपीएस-९५, संघटनेच्या पेन्शनरांची रुई या गावात “ग्राम संघर्ष समिती” ची स्थापना

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे – राहाता तालुक्यातील रुई या गावातील पेन्शनरांनी तालुक्यातील पहिली “ग्राम संघर्ष समिती “ची स्थापना रविवार दि.२२-०१-२०२३ रोजी झालेल्या मेळाव्यात करण्यात आली आहे. सभेचे अध्यक्षस्थानी गावातील जेष्ठ पेन्शनर एल.सी. आण्णा वाबळे हे होते. गेल्या आठ वर्षांपासून संघटनेने देशभर व दिल्ली येथे आंदोलने करूनही अद्याप पेन्शनवाढीचा प्रश्न मार्गी लागत नााही म्हणून पेन्शनर आपले अस्तित्व दाखविण्यासाठी देशभर गावोगाव “ग्राम संघर्ष समित्यांची” स्थापना करीत आहेत.
मेळाव्याला सरपंच संदिप वाबळे, गावचे माजी सरपंच रावसाहेब अण्णा देशमुख व इतर हितचिंतक ग्रामस्थ हजर होते. प्रास्ताविक संघटनेचे शिर्डी शहराध्यक्ष दशरथ पवार यांनी केले. पश्चिम भारत संघटक, सुभाषराव पोखरकर, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष देविसिंग अण्णा जाधव, संपतराव समिंदर, भगवंत वाळके आदींनी मार्गदर्शन केले. तसेच सरपंच संदिप वाबळे यांनीही विचार व्यक्त केले.
मेळाव्याला राहाता तालुकाध्यक्ष सुकदेव पा.आहेर, लोणी समिती सचिव, चिंतामणी, व १२० पेन्शनर हजर होते. समितीचे अध्यक्ष पदी सुभाषराव आरसुळे यांची निवड करण्यात आली, त्यांनी सर्वांचे आभार मानले. मेळाव्याचे यशस्वीतेसाठी लक्ष्मण कहांडळ, गंगाधर भारती, नारायण भारती, बाळासाहेब भडांगे, गीताराम शेलार, भिकचंद भडांगे यांनी विषेश परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button