कृषी

महात्मा फुले कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या टोमॅटो उत्पादक शेतकर्यांच्या शेतावर भेटी व मागदर्शन

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील वनस्पती रोगशास्त्र व अणुजीवशास्त्र विभाग आणि कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांचे संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार्या हॉर्टसॅप प्रकल्पामार्फत जि. औरंगाबाद येथील कन्नड तालुक्यातील रेल नाव्हाडी, लव्हाळी, गल्ले बोरगांव, हातनुर व देवगांव रंगारी या गावांना विद्यापीठातील शास्त्रज्ञ व कृषि विभागातील अधिकारी यांनी भेटी दिल्या.
या चमूमध्ये हॉर्टसॅप प्रकल्पातील संशोधन सहयोगी डॉ. प्रविण बाबासाहेब खैरे व कन्नड तालुका कृषि अधिकारी बाळराजे मुळीक, मंडळ कृषि अधिकारी के.एम. घुगरकर, कृषि पर्यवेक्षक राजेंद्र शिंदे, कृषि सहाय्यक श्रीमती देवरे व त्यांच्या विभागाचे कृषि अधिकारी यांचा समावेश होता. या भेटी दरम्यान शास्त्रज्ञ व अधिकार्यांनी शेतकर्यांच्या प्रत्यक्ष शेतावर जाऊन टोमॅटो उत्पादक शेतकरी यांच्यामध्ये सविस्तर चर्चा केली आणि चर्चेदरम्यान शेतकर्यांच्या शंकांचे निरसन करुन टोमॅटोच्या अधिक उत्पादनासाठी सविस्तर मार्गदर्शन केले.
सध्या रब्बी हंगामात लागवड केलेल्या टोमॅटोची तोडणी सुरु झालेली असुन काही प्रक्षेत्रांची तोडणी सुरु होणार आहे. त्याच बरोबर काही शेतकरी उन्हाळी हंगामासाठी टोमॅटो लागवडीची तयारी करत आहेत. सध्या शेतकर्यांच्या टोमॅटो पिकावर रसशोषण करणार्या किडींचा व रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामध्ये पांढरी माशी, फळ पोखरणारी अळी व टूटा नागअळी या किडींचा व बुरशीजन्य करपा या रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने दिसून येत आहे. त्या अनुषंगाने किड व रोगाच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी शेतकर्यांना सखोल असे मार्गदर्शन केले.
आर्थिक नुकसान पातळीच्यावर गेलेल्या गावांसाठी हॉर्टसॅप प्रकल्पांतर्गत वेळोवेळी एन.सी.आय.पी.एम., न्यु दिल्ली या संकेतस्थळावर विद्यापीठामार्फत सदर पिकासाठी पीकसरंक्षण सल्ला दिला जातो. तसेच टोमॅटो पीक किड व रोग नियंत्रण सल्ला यांच्या 50 प्रति शेतकर्यांना देण्यात आल्या. सदर प्रक्षेत्र भेटीसाठी विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे व वनस्पती रोगशास्त्र व कृषि अणुजीवशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक तथा हॉर्टसॅप प्रकल्प समन्वयक डॉ. संजय कोळसे यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Back to top button