अहिल्यानगर
हरिगाव येथे नाताळ सण उत्साहात साजरा
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील हरिगाव येथे संत तेरेजा चर्च येथे नाताळ सण मोठ्या भक्तिभावाने उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त दि १७ नोव्हेंबर २२ रोजी आगमन काळातील पहिला रविवार, ४ डिसेंबर २ रा रविवार, ११ डिसेंबर तिसरा रविवार, १८ डिसेंबर ४ था रविवार संपन्न झाला. दि २४ डिसेंबर रात्री मध्यरात्रीची पवित्र मिस्सा, नाताळ गीते झाली. नाताळ दिनी सकाळची मिस्सा ८.०० वा. झाली.
हरिगाव चर्च धर्मगुरू डॉमनिक सचिन व रिचर्ड आदींनी सर्वांना नाताळाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे, उद्योजक अशोक कानडे, ज्ञानेश्वर मुरकुटे, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, संचालक सिद्धार्थ मुरकुटे, माजी जि.प.सदस्य बाबासाहेब दिघे, सचिन गुजर, सुरेश गलांडे, सरपंच सुभाष बोधक, हरिगाव उपसरपंच दिलीप त्रिभुवन, जि दुध संघ संचालक राजेंद्र पाउलबुद्धे, बाळासाहेब नाईक, राजेंद्र नाईक, सुभाष पंडित, दीपक बोधक, प्रकाश ताके, सुनील शिणगारे, भीमराज बागुल, जेम्स पंडित, अमोल नाईक व ग्रामस्थ आदींनी हरिगाव येथे उपस्थित राहून सर्वांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या.
३० डिसेंबर पवित्र कुटुंबाचा सण, ३१ डिसेंबर पवित्र मारिया देवमाता सोहळा, साक्रामेंताची आराधना व पवित्र मिस्सा, १ जानेवारी २०२३ पवित्र मारिया थोर देवमाता सोहळा व नवीन वर्ष सोहळा, ८ जानेवारी प्रकटीकरणाचा सोहळा, दि ९ जानेवारी येशूचा स्नानसंस्कार, दि १२ डिसेंबर पासून नाताळ गीत फेरी परिसरातील खेडेगावात काढण्यात येत आहे. दि २२ डिसेंबर -बेलपिंपळगाव, पाचेगाव, दि २३ डिसेंबर – टाकळीभान, कमालपूर, दि २४ भोकर, वडाळा महादेव, माळवाडगाव या गावात फेरी झाली. हरिगाव प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे हे दिवंगत झाल्याने सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले नाहीत.