अहिल्यानगर
कोल्हार व उदरमल घाटाच्या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देणार – शिवाजीराव कर्डिले
खड्डेमय रस्त्यामुळे कोल्हार व उदरमल घाट बनला धोकादायक; रस्ता, साईड पट्टे व रुंदीकरणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी माजी मंत्री कर्डिले यांना निवेदन
अहमदनगर – खड्डेमय रस्त्यांमुळे अनेकांचे जीव जात असताना कोल्हार व उदरमल घाटातील रस्ता दुरुस्ती होण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करुन सदर प्रश्न मार्गी लावण्याचे निवेदन पंचक्रोशीतील ग्रामस्थ व जय हिंद फाउंडेशनच्या वतीने माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांना देण्यात आले. या घाटातील रस्त्याचा प्रश्न मार्गी लावून निधी कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन कर्डिले यांनी दिले.
पाथर्डी तालुक्याच्या कोल्हार व नगर तालुक्याच्या उदरमल घाटात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडून साईट पट्ट्या वाहून गेलेल्या आहेत. या घाटातून ग्रामस्थांची दररोजची रहदारी असल्याने अनेक लहान-मोठे अपघात घडत आहे. या घाटातील रस्ता दुरुस्तीसह रुंदीकरण करण्याची गरज असल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात म्हंटले आहे.
यावेळी जय हिंद फाउंडेशनचे शिवाजीराजे पालवे, माजी पंचायत समिती सदस्य एकनाथ आटकर, जय भगवान महासंघाचे मदन पालवे, जय हिंदचे शिवाजी गर्जे, निवृत मुख्याध्यापक महादेव पालवे, निवृत पोलिस अधिकारी शंकरराव डमाळे, माजी सरपंच बाबाजी पालवे, हिंदू सेनेचे किशोर पालवे, माजी सरपंच प्रकाश पालवे, नामदेव गिते आदी उपस्थित होते.
या घाटातील रस्त्यांची माजी मंत्री कर्डिले यांनी प्रत्यक्ष पहाणी केली असून, या घाटासाठी रस्त्यांसाठी तातडीने निधी उपलब्ध करून घाटातील रस्त्यांचे काम मार्गी लावणार असल्याचे शिष्टमंडळाला आश्वासन दिले आहे.