अहमदनगर
देशात प्रथमच डिजिटल करन्सीची सुरुवात हि भारत देशाला विश्व विजेता घोषित करेल -शिवाजीराजे पालवे
अहमदनगर : नुकतेच रिझर्व बँकेच्या माध्यमातून भारत देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा डिजिटल रुपया लॉन्च केला असून यामुळे देशातील आर्थिक व्यवहार अतिशय सुरळीत होतील व करप्शन मुक्त भारताची निर्मिती होऊन देशात प्रथमच डिजिटल करन्सीची सुरुवात हि भारत देशाला विश्व विजेता घोषित करेल, असे प्रतिपादन जय हिंद फाउंडेशनचे शिवाजीराजे पालवे यांनी व्यक्त केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, देशातील करप्शन संपल्यास अल्पवधी काळातच भारत देश जगाच्या पाठीवर सर्वात श्रीमंत व सर्व शक्तिशाली विश्वगुरू म्हणून देशाची ओळख निर्माण होईल. देशांमध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असल्याने डिजिटल करन्सी सुरू केल्यास देशातील नोटा छापण्याचे काम बंद होईल व कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही खरेदीसाठी किंवा विक्रीसाठी डिजिटल करन्सी द्वारा बँक मधून पैसे पाठवले जातील. आधार कार्ड व पॅन कार्डच्या माध्यमातून बँकेत येणारे पैशांचा हिशोब व्यवस्थित रित्या होईल. त्यामुळे देशांमध्ये इन्कम टॅक्स चे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसेल व सरकारच्या तिजोरीत भर पडेल. मार्केटमध्ये चाललेला काळाबाजार बंद होऊन देशाचा विकास अधिक गतीने होईल. काळा पैसा बंद होईल.
ऑनलाईन यंत्रणेमुळे पॅन कार्ड व आधार कार्ड मुळे आपण खर्च करत असलेले पैसे व त्याचा हिशोब सरकार दरबारी ऑटोमॅटिक पद्धतीने प्राप्त होईल. यामुळे गैरव्यवहार बंद होऊन विकासाची कामे अधिक गतीने होतील. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात डिजिटल करन्सीची सुरूवात करुन देशाला महासत्ता करण्यासाठी अतिशय मोलाचा पाऊल टाकले आहे. ज्या दिवशी देशांमध्ये पूर्णपणे डिजिटल करन्सीचा वापर होईल व नोटबंदी पूर्णपणे होईल. अवघ्या एका वर्षांमध्ये भारत महासत्ता होईल यात शंका नाही. देशासाठी हे एक मोठे व अनमोल कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून होईल. गोरगरिबांसाठी अनेक योजना पारदर्शी पद्धतीने राबवता येतील व गोरगरिबांना न्याय देण्यासाठी हे पाऊल योग्य असल्याचे माजी सैनिक शिवाजीराजे पालवे यांनी म्हटलेे आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारत सरकारचे जय हिंद फाउंडेशन अहमदनगरच्या वतीने आभार मानले व सार्थ अभिमान असल्याचे म्हटले आहे.