अहिल्यानगर

इंद्रधनुष्य स्पर्धेत साईदीप हॉस्पिटल व स्वामी विवेकानंद नर्सिंग होम यांनी पुरवली मोफत वैद्यकीय सेवा

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे दि. 5 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर, 2022 या कालावधीत 18 वा इंद्रधनुष्य-2022 हा राज्य अंतर विद्यापीठ युवक महोत्सव संपन्न होत आहे. या युवक महोत्सवात वेगवेगळ्या विद्यापीठातून युवक स्पर्धक, परीक्षक, निरीक्षक तसेच संबंधित अधिकारी या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. या सर्वांचे आरोग्यविषयी काळजी म्हणून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांचे मार्गदर्शनातून यजमान महात्मा फुले कृषी विद्यापीठ मार्फत 24 तास मोफत वैद्यकीय सेवा पुरविण्यात आली आहे.
सदर वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी विद्यापीठाच्या विनंतीस मान देऊन अहमदनगर शहरातील सुप्रसिद्ध मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून नावलौकिक असलेले साईदीप हेल्थकेअर अँड रिसर्च प्रा. लि. यांनी दररोज 24 तास सेवेसाठी चार डॉक्टरांचा समूह व एक रुग्णवाहिका विद्यापीठ प्रशासनास विनामूल्य देऊन उपकृत केले आहे. त्याबद्दल साईदीप हॉस्पिटल, अहमदनगर यांचे सर्व चेअरमन डॉ. एस. एस. दीपक व त्यांची संपूर्ण मॅनेजमेंट मधील अधिकारी व सर्व डॉक्टर्स यांचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ मार्फत मनःपूर्वक धन्यवाद व आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
याबरोबरच विद्यापीठाचे विनंतीस मान देऊन राहुरी फॅक्टरी येथील स्वामी विवेकानंद नर्सिंग होमचे आयुर्वेद महाविद्यालयाने विनामूल्य दररोज पाच वैद्यकीय अधिकारी रात्रंदिवस वैद्यकीय सेवेसाठी दिले आहेत. सदरच्या अखंडित वैद्यकीय सेवेसाठी वैद्यकीय समितीने विशेष परिश्रम घेतले. या सर्व डॉक्टर्स व अधिकाऱ्यांचे विद्यापीठाकडून आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

Related Articles

Back to top button