अहिल्यानगर

अखेर उंदिरगाव व्यायामशाळा सुरू

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : गेली अनेक वर्षे उंदिरगावची व्यायामशाळा धूळ खात पडलेली होती. गावकऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आज दि 7 नोव्हेंबर 2022 रोजी उंदिरगाव येथे तालुक्याचे आमदार लहुजी कानडे यांच्या हस्ते व्यायामशाळा साहित्याचे लोकार्पण करण्यात आले.
आमदार कानडे यांनी या प्रसंगी व्यायामशाळेची पहाणी केली. कुठल्याही व्यायाम साहित्यामध्ये काही त्रुटी आढळल्यास ते बदलून घेण्याची सूचना ग्रामस्थांना केली. या प्रसंगी आमदार यांनी व्यायाम देखील केला व व्यायामाचे महत्व देखील सांगितले. व्यायामशाळेचे पत्रे बदलण्याची सूचना आ कानडे यांनी सरपंच सुभाष बोधक यांना केली. मागणी करताच साहित्य कुठलीही वेळ न दवडता ताबडतोब उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार कानडे यांचे आभार राजेंद्र पाऊलबुद्धे व मनोज बोडखे यांनी व्यक्त केले.
ग्रामस्थांनी गावातून जाणाऱ्या इतर रस्त्यांची मागणी या कार्यक्रम प्रसंगी आमदारांकडे केली. लवकरच सर्व कामे मार्गी लावू असे आश्वासन आमदार कानडे यांनी दिले. सरपंच बोधक यांच्या हस्ते आमदार कानडे यांचा सत्कार करण्यात आला. सुरेश ताके यांचा सत्कार उपसरपंच गायके यांनी केला. पवन पाऊलबुद्धे व त्यांच्या साथीदारांनी वारंवार पाठपुरावा ठेवल्यामुळे व्यायामशाळा व साहित्य लोकार्पण करण्यास वेग आला असे उदगार सरपंच बोधक यांनी काढले. दिलीप गलांडे यांनी प्रस्तावना केली.
या कार्यक्रमास उंदिरगावचे सरपंच सुभाष बोधक, उपसरपंच रमेश गायके, दूध संघाचे संचालक राजेंद्र पा पाऊलबुद्धे, शेतकरी संघटना नेते सुरेश ताके, उंदिरगाव सोसायटीचे चेअरमन प्रमोद भालदंड, ग्रा प सदस्य प्रकाश ताके, काँग्रेस उपाध्यक्ष अमोल नाईक, दिलीप गलांडे, कचरू भालदंड, कादरभाई, बापू गोरे, भाऊसाहेब मोरे, योगेश रोकडे, अनिल रोकडे, मनोज बोडखे, किशोर नाईक, पवन पाऊलबुद्धे, अजिंक्य जीवरक, शुभम गोरे व मोठ्या प्रमाणात तरुण उपस्थित होते. कार्यक्रम खेळीमेळीत पार पडला.

Related Articles

Back to top button