ठळक बातम्या
अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांची जयंती उत्साहात साजरी
लोणी खुर्द : येथील साईश्रध्दा ऑटो सर्व्हिसेसचे मालक व सिंधुताई सपकाळ यांचे जावई नारायण हिवाळे यांच्या गॅरेजवर कृषीभुषण सौ. प्रभाताई जनार्दन घोगरे यांच्या उपस्थितीत सिंधुताई सपकाळ यांची जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
सौ. प्रभाताई घोगरे मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, सिंधुताई सपकाळ यांचे कार्य खुप महान असुन समाजासाठी मोठे दिशादर्शक आहे. अनाथाची माय म्हणुन त्याची जनमानसात मोठी ओळख असुन त्याचे कार्य खुपचं उल्लेखनीय आहे. भारत सरकारने त्याच्या कार्याचा मोठा सन्मान केला असुन पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेले आहे. आज समाजात कोणी कोणाचा नाही असा भ्रम निर्माण झाला. आरोप प्रत्यारोपाने समाज पोखरला असुन भाऊ – भावाचा, बहीण- भाऊ यांचे पवित्र नाते लोप पावत चालेले आहे. पैसा हे सर्वस्व अशी व्याख्या सुरु झाली असुन मानवता, माणुसकी, नितीमुल्य याला समाजात तिलांजली दिली जाते. आज समाज एक वेगळ्या दिशेने भरकटतोय हे बघितल्यावर अतीशय वाईट वाटते.
परंतु या सर्व बाबीवर पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांनी मात करुन समाजात ज्यांना आई ची माया मिळाली नाही त्यांची आई होवुन त्याचे मागे खंबीरपणे उभे राहून त्यांना आईची माया देऊन समाजात उभे केले आहे. हजारो अनाथ मुलामुलींचा सांभाळ त्यांनी केला असुन त्यांना सुसंस्कृत संस्कार बाहल करुन त्यांना शिक्षण देऊन त्याच्या पायावर उभे करुन त्याचे लग्न कार्य करण्याचे पवित्र कार्य या माऊलीने केलेले आहे. म्हणुनचं त्यांनी हजारो अनाथांची माय अशी एक स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. म्हणुनचं समाजाने त्यांना अनाथाची माय ही उपाधी दिलेली आहे. माझ्यासह आजच्या नविन पिढीने तसेज समाजातील सर्वाचं घटकांनी त्याचा आदर्श घ्यावा. असे गौरवोद्गार त्याच्या जयंती निमित्त सौ प्रभाताई घोगरे यांनी काढले.
यावेळी लोणी खुर्द च्या उपसरपंच आर्चना आहेर, सुनिता कोरडे, मुक्ताबाई आहेर, सेवा संस्थेचे चेअरमन राजेंद्र आहेर, श्रीकांत मापारी, विलास घोगरे, बाळासाहेब आहेर, बापु घोगरे, आनिल आहेर, दिपक घोगरे, नानासाहेब कुरकुटे, रनजित आहेर, सुहास आहेर, मुन्ना आहेर, दिनकर आहेर, आण्णासाहेब शेळके, जयराम आहेर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.