अहिल्यानगर
माळी समाजाच्या सक्रिय संघटनेत तरुणांनी सहभागी व्हावे-महाराष्ट्र भूषन सचिन भाऊसाहेब गुलदगड
नगर – श्री संत सावता माळी युवक संघाची बर्याच वर्षांपासुन नगर दक्षिण जिल्हा कार्यकारीणी पुनर्रचना करावयाची गरज होती. त्याअनुषांगाने नगर तालुक्यातील शेंडी पोखर्डी येथे संघटनेची छोटेखानी सभा संपन्न झाली.
यावेळी संघाचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषन लोकनेते सचिन भाऊसाहेब गुलदगड, राज्यसचिव सुनिल गुलदगड, विभागीय अध्यक्ष कैलासराव शिंदे, नानाभाऊ सुसे, भिमा शिंदे, अविनाश शिंदे, डॉ. भगवान चौरे, नगर तालुका सल्लागार लवेश गोंधळे, नगर तालुकाध्यक्ष सागर खरपुडे, गणेश त्रिंबके, साहेबराव चौहान, बाबासाहेब पडवळे, प्रविनभाऊ जावळे, किशोर शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते.
श्री संत सावता माळी युवक संघाच्या नगर जिल्हा पुनर्रचनेत संघाचे जेष्ठ सल्लागार दत्तात्रय जाधव यांच्यावर दक्षिण नगर जिल्हाअध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. श्री संत सावता माळी युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषण लोकनेते सचिन भाऊसाहेब गुलदगड यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी श्री. गुलदगड म्हणाले की, श्री संत सावता माळी युवक संघ राज्यातीलच नव्हे तर देशातील एकमेव अशी संघटना आहे की, खेड्यापाड्यातील तरुणांना व महिलांना एकत्रित करण्याचे काम करत आहे. त्याच अनुषंगाने जिल्हाध्यक्ष पद महत्वाचे असल्याने ते संघाचे जेष्ठ सदस्य तथा जिल्हा सल्लागार दत्तात्रय जाधव यांना सर्वानुमते नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती दिली असल्याची माहिती संघाचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषण लोकनेते सचिन भाऊसाहेब गुलदगड यांनी दिली. सदर बैठकीस संघाचे जिल्हाभरातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.