अहिल्यानगर
हरेगांव येथे संविधान दिन महोत्सवाचे आयोजन
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : हरेगांव स्वाभिमान भूमी येथे 26 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी 6 ते 10 या वेळेत संविधान दिन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.किरण खाजेकर, प्रमुख वक्ते रमेश मकासरे तर प्रमुख पाहुणे म्हणून विविध मान्यवर उपस्थित राहणार आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रगीत गायन व भारतीय संविधान उद्देशिका वाचन केले जाणार आहे. या निमित्ताने निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून याच ठिकाणी विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे ठिकाण गौत्तम चित्ते डी टाईप हरेगांव ( प्रकाश आंबेडकर नगर ) येथे आहे.
यावेळी विविध राजकीय, समाजिक, धार्मिक कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन सेना व समस्त युवा मित्र परिवार हरेगांव यांच्या वतीने करण्यात आले आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन हरेगाव जनहित विकास समितीचे अध्यक्ष सुनील शिणगारे यांनी केले आहे.