अहिल्यानगर

सोनगाव येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन

सोनगाव – आज राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना सोसायटीचे चेअरमन राजेंद्र अनाप म्हणाले की, यशस्वीपणे पंतप्रधान पदाची धुरा सांभाळून देशाला विकसनशील करण्यात माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे काठी हातात घेऊन अहिंसेच्या मार्गाने देशाच्या स्वतंत्र लढ्यात महत्त्वपूर्ण योगदान या दोन्ही महापुरुषांचे असून भारत मातेचे हे दोन पुत्र यांचा सर्व भारतीयांना अभिमान आहे आणि यांच्यामुळेच विश्वात भारतीयांना सन्मान मिळाला असल्याचे प्रतिपादन श्री अनाप यांनी केले.
याप्रसंगी भाजपा ओबीसी युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा सोनगावचे उपसरपंच किरण पाटील अंत्रे, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय अंत्रे, संदीप अनाप, सदाशिव अंत्रे, संजय पांडे, संजय अनाप, ग्रामपंचायत कर्मचारी आबासाहेब अनाप, सचिन अंत्रे, पांडुरंग पवार आदी पदाधिकारी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोसायटीचे संचालक शामराव अंत्रे यांनी केले तर चंद्रकांत अनाप यांनी आभार मानले.

Related Articles

Back to top button