अहिल्यानगर

एकरी २५ हजारांची मदत देऊन दिवाळी गोड करा – सरपंच मेजर खपके

राहुरी | जावेद शेख : सध्या जिल्ह्यासह राहुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत आहे. ओढे, नाले तुडुंब भरून खळखळत आहेत. अनेक शेतांमध्ये गुडघाभर पाणी साचले आहे. त्यामुळे खरीप पिके सडून गेली आहे. त्यामुळे बळीराजाचे मोठे नुकसान झाले आहे. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये नुकसानभरपाई दिवाळीपूर्वी द्यावी अशी मागणी दवणगाव येथील सरपंच मेजर भाऊसाहेब खपके यांनी केली आहे.
प्रशासनाने तत्परता दाखवत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे बांधावर जाऊन पंचनामे सुरू केले. या पंचनाम्यांचा अहवाल शासनाला दिला जाईल. मात्र शेतकऱ्यांच्या पदरात किती मदत पडते याकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. त्यामुळे शासनाने कोणत्याही अटी न घालता सरसगट एकरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई दिवाळीच्या पूर्वी द्यावी अशी मागणी मेजर भाऊसाहेब खपके यांनी केली आहे. असे न झाल्यास राजाने मारले आणि निसर्गाने झोडपले अशी दुहेरी अवस्था शेतकऱ्यांची होऊन जाईल.
त्यामुळे शासनाने लवकरात लवकर मदत जाहीर करून बळीराजाची दिवाळी गोड करावी अशी मागणी सरपंच मेजर भाऊसाहेब खपके, उपसरपंच गोकुळदास साळुंके, ग्रामपंचायत सदस्य भरत होन, भाऊसाहेब मोहटे, प्रदीप भोसले, सोसायटीचे चेअरमन प्रभाकर होन, नानासाहेब पांडागळे, पोलीस पाटील नंदकिशोर खपके, जेष्ठ नेते कुंडलिकराव खपके, दादासाहेब महाडिक, ज्ञानदेव खपके, शिवाजी होन, बाळासाहेब पागिरे, पांडुरंग कासार, सयराम जऱ्हाड, भरत थोरात, चंद्रकांत पागिरे, भाऊसाहेब साळुंके, अंतोन भोसले यांसह शेतकऱ्यांनी केली आहे.

Related Articles

Back to top button