ठळक बातम्या
भारत जोडो यात्रेच्या स्वागतासाठी प्रदेश काँग्रेसचा अनुसूचित जाती विभाग सज्ज- महासचिव भोसले
राहुरी | बाळकृष्ण भोसले – काँग्रेस पक्षाचे नेते राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण संचारले आहे. राहूल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात येणार आहेत. नांदेड जिल्ह्यातून ते महाराष्ट्रात प्रवेश करतील आणि अकोला, वाशीम, बुलढाणा जिल्ह्यातून प्रवास करीत ते नंतर मध्य प्रदेशाकडे रवाना होतील या यात्रेच्या स्वागतासाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचा अनुसूचित विभाग सज्ज झाला असल्याची माहिती प्रदेश महासचिव संजय भोसले यांनी दिली.
यात्रेच्या महाराष्ट्रातील आगमनाची आम्हा सर्वांना चातकासारखी प्रतीक्षा आहे. त्यांच्यासह यात्रेतील यात्रेकरूंचे स्वागत, आदरातिथ्य करण्यासाठी आम्ही सारेच सज्ज होत आहोत. या यात्रेबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेससोबतच प्रदेश काँग्रेसचा अनूसूचित जाती विभाग जोरदार तयारीला लागला आहे. या विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश लाडे यांनी आज प्रदेश काँग्रेसतर्फे आयोजित आढावा बैठकीस हजेरी लावली. माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, डॉ.नितीन राऊत, ॲड.यशोमती ठाकूर, यात्रेचे समन्वयक मोहन जोशी, अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सह-प्रभारी आशिष दुआ व सोनल पटेल हे या बैठकीला उपस्थित होते.
या यात्रेबाबत अनुसूचित जाती काँग्रेसने काय तयारी केली आहे व भविष्यातील नियोजन कसे असणार आहे, याची माहिती श्री. राजेश लाडे यांनी यावेळी दिली. यासोबतच अनुसूचित जाती काँग्रेसचे या तीन जिल्ह्यातील प्रमुख नेते व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केली. यावेळी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश सचिव गौतम गवई, प्रदेश महासचिव महेंद्र गवई, प्रदेश सचिव अभिजीत मेश्राम, प्रदेश उपाध्यक्ष विनोद बेंडवाल, प्रदेश महासचिव संजय भोसले, अकोला जिल्हा कार्याध्यक्ष भुषण गायकवाड, अकोला जिल्हाध्यक्ष प्रमोद डोंगरे, जिल्हाध्यक्ष बुलढाणा प्रमोद अवसरमोल आदी अनुसूचित जाती विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते यात्रेला यशस्वी ठरविण्यात काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे कार्यकर्ते कोणतीही कसर ठेवणार नाही, असा विश्वास त्यांना यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी दिला. या यात्रेच्या पूर्वतयारीत वा नियोजनात अनुसूचित विभागाच्या कार्यकर्त्यांनी हिरीहिरीने पुढाकार घेऊन काम करावे, अशा सूचना उपाध्यक्ष लाडे यांनी दिल्या.
दलित समाजातील तरूणांमध्ये राहूल गांधी यांच्या नेतृत्वाबद्दल प्रचंड आकर्षण आणि विश्वास आहे. महामनाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना केवळ काँग्रेस पक्ष आणि राहूल गांधी यांचे नेतृत्वच वाचवू शकते. त्यामुळे ही यात्रा केवळ भारत जोडणारी नसून संविधानाचे रक्षण करण्याचाही संघर्ष आहे, हे लक्षात घेऊन पूर्ण ताकदीनिशी या यात्रेला यशस्वी करा, असे आवाहन उपाध्यक्ष राजेश लाडे यांनी यावेळेस अनुसूचित जाती काँग्रेसच्या सर्व नेत्यांना व कार्यकर्त्यांना केले.