अहिल्यानगर
शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अडसुरे, उपाध्यक्षपदी ढगे
राहुरी : वरवंडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी जालिंदर अडसुरे तर क्रांतीसेनेचे जिल्हा प्रमुख नवनाथ ढगे यांची शालेय शिक्षण समितीच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याची माहिती मुख्याध्यापक श्रीमती जाधव मॅडम यांनी दिली.
वरवंडी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी समितीची निवड करण्यात आली.शालेय व्यवस्थापन समितीवर निवड झालेल्या अध्यक्ष,उपाध्यक्ष यांचा सत्कार माजी सरपंच रावसाहेब अडसुरे यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी संजय अडसुरे,दिगंबर ताकटे,बाळासाहेब पवार,कानिफनाथ ढगे,कैलास ढगे,आदिनाथ ढगे,नारायण शिंदे, नितीन बरे,सर्व शिक्षक,पालक,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवड समितीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे क्रांतीसेनेचे राज्य संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील, उपाध्यक्ष गोरक्षनाथ माळवदे,कार्याध्यक्ष संदीप ओहोळ,डिग्रस ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर भिंगारदे,संघटक जालिंदर शेडगे,राहुरी तालुका अध्यक्ष संदीप उंडे,उपाध्यक्ष सचिन गागरे,शेखर पवार,श्याम कदम,पप्पु हरिश्चंद्रे, वसंतराव कदम, सुनिल काचोळे,सोमनाथ वने आदींनी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.सूत्रसंचालन खोसे मॅडम व आभार कैलास ढगे यांनी केले.