अहिल्यानगर
रासप चे महादेव जानकर यांची चिंचोली येथे लाटे कुटुंबियांना भेट
राहुरी | बाळकृष्ण भोसले – राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर यांनी चिंंचोली येथील युवा कार्यकर्ते कपिल लाटे यांच्या निवासस्थानी भेट देत कुटुंबियांशी चर्चा करत आस्थेवाईक चौकशी केली.
शिर्डी येथे पक्षाच्या उत्तर महाराष्ट्र पदाधिकारी चर्चा सत्राच्या कार्यक्रमनिमित्त रात्री जात असताना चिंचोली येथे कपिल राजेंद्र लाटे यांच्या निवासस्थानी मुक्काम केला. प्रसंगी परिसरातील राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करत समाज बांधवाच्या प्रश्नाबरोबरच पक्षवाढीसंदर्भात सांगोपांग चर्चा केली. बरोबरच चिंचोलीचे सरपंच गणेश हारदे यांनीही श्री जानकर यांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली.
चिंचोली ग्रामस्थांनी श्री जानकर यांचा प्रसंगी यथोचित सत्कार करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी चिंचोली गावचे ज्येष्ठ नेते जालिंदर काळे, उपसरपंच विलास लाटे, तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब लाटे, ग्रामपंचायत सदस्य शरद आरगडे, सर्जेराव लाटे, सुरेश उर्फ बंटी लाटे, रायभान नलगे, संजय गागरे, प्रकाश लाटे, दिलीप दाढकर, सोमनाथ लाटे, दत्तु काळे, रंगनाथ लाटे, सोसायटी व्हा.चेअरमन अरुण लाटे, विनोद लाटे, गणेश लाटे, सचिन कातोरे, अनिल नलगे, अक्षय राऊत, संतोष नेहे आदींसह बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते.