पश्चिम महाराष्ट्र

सहाय्यक आयुक्त संगीता डावखर राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : सहाय्यक आयुक्त सामाजिक न्याय विभाग व समाज कल्याण पुणे च्या सहाय्यक आयुक्त संगीता डावखर यांना अहिल्याबाई होळकर सामाजिक ट्रस्टच्या वतीने उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी पुरस्कार 2022 ने नामवंत मान्यवरांच्या शुभहस्ते पुणे येथे गौरवण्यात आले आहे. अशी माहिती भूमी फाउंडेशन अध्यक्ष प्रा कैलास पवार यांनी दिली.
शासनाने नवीन लक्ष केंद्रित केलेला विषय म्हणजे तृतीयपंथी समाजाचा विकास याकरिता सहाय्यक आयुक्त संगीता डावखर यांनी सामाजिक न्याय विभाग व समाज कल्याण पुणे च्या माध्यमातून तृतीयपंथी समाजाकरिता विविध उपक्रम हाती घेण्यात आले. तसेच पुणे जिल्ह्यातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप साठी येणाऱ्या अडीअडचणी वरती विविध उपाय योजना राबवून विद्यार्थ्यांना सुलभ प्रणाली उपलब्ध करून दिली. या सर्व कामाची दखल घेत अहिल्याबाई होळकर सामाजिक ट्रस्टच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्काराने सहा. आयुक्त संगीता डावखर यांना सन्मानित करण्यात आले. या सन्मानाने सर्वच जिल्ह्यातून श्रीमती डावखर यांचे कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे. भूमी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सामाजिक संस्थेला देखील नेहमीच त्या सातत्याने मदत करत असतात.
पुरस्काराबद्दल प्राचार्य टी ई शेळके संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलास पवार साहित्यिक लेखक डॉ. बाबुराव उपाध्ये, प्रा शिवाजीराव बारगळ, मा प्राचार्य शंकरराव गागरे, प्राचार्य शंकरराव अनारसे, पत्रकार प्रकाश कुलथे, पत्रकार बी आर चेडे, भीमराज बागुल, सुकदेव सुकळे आदिनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Back to top button