अहिल्यानगर
शिलेगाव सोसायटीकडुन ३५ वर्षानंतर प्रथमच लाभांश वाटप
राहुरी : तालुक्यातील शिलेगाव येथे योगिराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांची १२० वी पुण्यतिथी व मंदिर जिर्णोद्धार पूर्वक विविध देवता प्राणप्रतिष्ठा तसेच श्री हरिहर महायज्ञाचे निमंत्रण व नियोजन बैठक महंत गुरुवर्य स्वामी श्री रामगिरीजी महाराज यांच्या उपस्थितीत पार पडली.
त्याप्रसंगी महाराजांनी बेटावर होणाऱ्या कार्यक्रमासंदर्भात ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमासाठी मदत करण्याचे आवाहन करून होणाऱ्या कार्यक्रमाच्या खर्च व नियोजन संदर्भात चर्चा केली. त्याप्रसंगी शिलेगाव वि.वि.कार्य.सह. सोसायटीच्या लाभांश वाटपाचा कार्यक्रम सराला बेट संस्थानचे मठाधिपती गुरूवर्य महंत रामगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते पार पडला. सोसायटीच्या सभासदांना ३५ वर्षानंतर प्रथमच लाभांश वाटप करण्यात आला. सोसायटीत राजकीय परिवर्तन घडवून आल्यानंतर दिवाळीनिमित्त ७ टक्के लाभांश वाटप केल्याने नवीन संचालक मंडळाने सभासदांची दिवाळी गोड केल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये रंगली आहे.
यावेळी कैलास म्हसे, प्रभाकर म्हसे, कुंडलिक खिलारी, शिलेगाव सोसायटीच्या उपसभापती सौ.विठाबाई तागड, संस्थेचे मार्गदर्शक डॉ.पांडुरंग म्हसे, रमेश चंद्रकांत म्हसे, भगवान म्हसे, क्रांतीसेनेचे अध्यक्ष संदीप उंडे, चांगदेव नारायण म्हसे, ज्ञानेश्वर म्हसे, पांडुरंग तागड, उत्तम देवरे, बाळासाहेब म्हसे, गोडाजी भांड, ज्ञानदेव भांड, बाबासाहेब वने, बाळासाहेब म्हसे, संतोष देवरे, नानासाहेब कोळसे, गंगाधर म्हसे, परशराम कोळसे, भारत देवरे, राधाकृष्ण देवरे आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.