निधन वार्ता
हरिगाव चर्च प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे यांचे निधन
श्रीरामपूर : तालुक्यातील हरिगांव येथील संत तेरेजा चर्च हरिगांव येथील प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे यांचे अल्पशा आजाराने पुणे येथे 14 ऑक्टोबर रोजी रात्री 10:50 वाजता दुःखद निधन झाले. त्यांनी धर्मगुरू पदाचे 26 वर्ष कार्य केले. त्यांचा रौप्य महोत्सव येथेच साजरा झाला.
हरिगांव येथे आल्यावर रोझरी गार्डन आदी अनेक सुविधा केल्या. दोन वर्षानंतर त्यांचे काळात उपस्थितीत लाखो भाविकांची मतमाऊली यात्रा महोत्सव साजरा करण्यात आला. दि 15 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता पवित्र मिस्सा हरिगांव येथे होणार असून दुपारी 4 वा अंत्यविधी संत फ्रँसिस झेवीयर चर्च राहाता येथे होणार आहे. स्व सुरेश साठे यांना हरिगांव, उंदीरगाव ग्रामस्थांचे वतीने भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली.