अहिल्यानगर
श्री संत सावता माळी युवक संघाकडून राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम जयंती साजरी
अहमदनगर : राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमीत्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पन करुन श्री संत सावता माळी युवक संघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र भुषन लोकनेते सचिन भाऊसाहेब गुलदगड यांनी अभिवादन केले.
अवुल पाकीर जैनुलाब्दीन तथा ए.पी.जे अब्दुल कलाम (१५ ऑक्टोबर १९३१ – २७ जुलै २०१५) हे एक भारतीय एरोस्पेस शास्त्रज्ञ होते. तसेच त्यांनी २००२ ते २००७ या काळात भारताचे ११ वे राष्ट्रपती म्हणून देखील काम केले होते. कलाम हे तामिळनाडूच्या रामेश्वरम येथे वाढले होते, आणि तेथेच त्यांनी भौतिकशास्त्र आणि एरोस्पेस अभियांत्रिकीचा अभ्यास केला. त्यांनी पुढील चार दशके शास्त्रज्ञ आणि विज्ञान प्रशासक म्हणून, प्रामुख्याने संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) येथे काम केले.