अहिल्यानगर

कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांनी अनुकंपा तत्त्वावरील कर्मचाऱ्यांना दिली दिवाळीची भेट

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांच्या प्रयत्नाने विद्यापीठ प्रशासनाने मयत कर्मचाऱ्यांच्या कायदेशीर वारसास अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्यांचे आदेश नुकतेच निर्गमित केले आहेत. यामध्ये लिपिक, प्रयोगशाळा परिचर, मजूर व शिपाई या प्रवर्गांचा समावेश असून एकूण 18 जणांना विद्यापीठ सेवेत सामावून घेण्यात आले आहे.
शासकीय नियमानुसार एखादा कर्मचारी कर्तव्यावर असताना जर मयत झाला तर त्याच्या कायदेशीर वारसास अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याचा नियम आहे, त्यानुसारच संबंधित कर्मचाऱ्यांच्या वारसास नियुक्ती दिल्याची माहिती राहुरी कृषि विद्यापीठाचे कुलसचिव प्रमोद लहाळे यांनी दिली. ऐन दिवाळीच्या दिवसांमध्ये सदर नियुक्तीचे आदेश दिल्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबामध्ये दिवाळीच्या सणाचा आनंद द्विगुणित झाला असल्याचे मत संबंधित कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले.

Related Articles

Back to top button