ठळक बातम्या
खा. लोखंडे यांच्याकडुन लोणी खुर्दच्या अतिवृष्टीग्रस्तांना अडीच लाखांची मदत – सरपंच जनार्दन घोगरे
खा. लोखंडे यांचा सत्कार करताना सरपंच जनार्दन घोगरे यांच्यासह श्रीकांत मापारी व सहकारी…
लोणी : राहाता तालुक्यातील लोणी खुर्द व आसपासच्या काही गावात अचानक झालेल्या आतिवृष्टीत नागरिकांचे घरं दारं पाण्यात गेले. त्यात त्याचे संसार उपयोगी सामानही पाण्यात गेले. त्यांना खा. सदाशिव लोखंडे यांनी मुख्यमंत्र्याकडुन १ कोटी २० लाख रुपये अर्थिक मदत दिल्याची माहिती सरपंच जनार्दन घोगरे यांनी दिली.
सरपंच घोगरे पुढे म्हणाले की, तालुक्यातील अनेक गावात ढगफुटीसदृश्य पाऊस पडल्याने अनेक नागरिकांचे घरं, झोपड्या उध्वस्त झाल्या, पाण्याखाली गेल्या. त्याच्या दैनंदिन उपयोगाच्या वस्तु, धान्य, कपडे, किराणा, भांडी, सह घरं, दारं निकाम्या झाले. जवळपास आठवडाभर ही घरे पाण्याखाली असल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. लोणी खुर्द गावातील अनेक पण विषेशतः संपूर्ण भीमनगर पाण्याखाली होते. त्यात प्रचंड नुकसान झाले होते. त्यासाठी खा. सदाशिव लोखंडे यांनी शासकीय मदत उपलब्ध करुन द्यावी म्हणुन तालुक्यातील आमच्यासह अनेक नागरिक मागणी करत होते.
अतिवृष्टीग्रस्त नागरिकांचा विचार करुन खा. लोखंडे यांनी मा मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष निधीतून मदत मिळावी म्हणून मा. मुख्यमंत्री साहेब यांची भेट घेऊन अतिवृष्टीग्रस्त नागरिकांची वस्तुस्थिती लक्षात आणुन दिली. मुख्यमंत्र्यांनी लगेच शिर्डी विधानसभेतील १२०० अतिवृष्टीग्रस्त कुटुंबातील नागरिकांसाठी सुमारे १ कोटी २० लाख रुपयांची मदत दिली. त्यातील लोणी खुर्द गावातील अतिवृष्टीग्रस्त ५० कुटुंबाला २ लाख पन्नास हजार रुपये मदत दिली व ती संबधीत नागरिकांच्या बँक खात्यात वर्ग ही करण्यात आली.
ऐन दिवाळीत संकट ओढवलेले असताना गोरगरीब नागरिकांना खा. लोखंडे यांनी संकटकाळी शासकीय मदत मिळवुन दिल्याने अतिवृष्टीग्रस्त नागरिक समाधान व्यक्त करत आहे असे सरपंच घोगरे म्हणाले. अतिवृष्टीग्रस्तांना संकटाच्या काळात मदत केल्याबद्दल लोणी खुर्द चे सरपंच जनार्दन घोगरे, श्रीकांत मापारी, विलासभाऊ घोगरे, रनजित आहेर यांनी खा. लोखंडे यांचे आभार मानले.