अहिल्यानगर
दूध उत्पादकांचा साखर वाटप करून केलेला सन्मान इतरांसाठी दिशादर्शक -महंत ह. भ. प.दत्तगिरीजी महाराज
राहुरी शहर | अशोक मंडलिक : दूध संकलन केंद्राकडून दूध उत्पादकांना दीपावली सणानिमित्त एक रकमी ठेव परत करून, रिबेट म्हणून साखर वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या ठिकाणी सर्व दूध उत्पादकांचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला. वर्षभर केलेल्या दूध पुरवठ्या मधून प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक काढून त्यांचा शाल, फेटा, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह. भ. प. महंत दत्तगिरीजी महाराज होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विक्रमराव तांबे, पत्रकार राजेंद्र वाडेकर, चंद्रगिरी दूध संकलन व शीतकरण केंद्राचे चेअरमन नानासाहेब जुंधारे, दैवत दूध संघाचे चेअरमन केशवराव शिंदे, भैरवनाथ दूध संकलन व शीतकरण केंद्राचे चेअरमन पियुष शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, तुळजा माता दूध संकलन केंद्राचे चेअरमन अशोकराव आंधळे, ढाकणे वस्ती दूध संकलन केंद्राचे चेअरमन बाबासाहेब ढाकणे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रभाकर गाडे या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोरपडवाडी येथे कार्यक्रम संपन्न झाला.
प्रथम प्रमुख पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला. पाहुण्यांचा सन्मान अनुक्रमे बाबुराव शेंडगे, हरिभाऊ हापसे, आप्पासाहेब बाचकर, रभाजी शेंडगे, भारत लांडगे, बाबुराव बाचकर, बुवाजी शेंडगे, गणेश तमनर व नारायणराव तमनर यांच्या वतीने करण्यात आला. प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराचे मानकरी रावसाहेब मारुती शेंडगे हे ठरले. त्यांचा शाल व फेटा बांधून बिरोबा दूध संकलन केंद्राचे स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. द्वितीय क्रमांक राजू जानकू देवकाते तसेच तृतीय क्रमांक पोपटराव बाबुराव तमनर यांनाही अनुक्रमे शाल, फेटा, स्मृतीचिन्ह प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
प्रास्ताविकात नारायणराव तमनर यांनी सांगितले की दूध संकलन केंद्राची स्थापना चार वर्षापूर्वी झाली असून तीन वर्षापासून असा उपक्रम अविरत सुरू असल्याचे सांगितले. वर्षभरातून एकदा तरी दूध उत्पादकांचा सन्मान होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच दूध पुरवठा करताना निर्भेळ दूध व गुणवत्तापूर्वक दूध सर्वांनी संकलन केंद्रासाठी पुरवावे तसेच दूध संकलन केंद्राचा पारदर्शक व्यवहार,उच्चतम दर, वेळेवर पेमेंट,आर्थिक अडचणीला होणारी मदत याबरोबरच अनेक वैशिष्ट्ये विशद केली.
प्रमुख पाहुण्यांमध्ये पत्रकार वाडेकर म्हणाले की संस्थेचा कारभार पारदर्शक असून नारायणराव तमनर यांचे काम नेहमी आदर्शवत राहिले आहे. संस्थेला त्यांच्या अनुभवाचा नक्की फायदा होईल. इतरांपेक्षा त्यांचे काम नेहमी दिशादर्शक राहिले आहे असे बोलून त्यांनी सणाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर नानाभाऊ जुंधारे बोलताना म्हणाले की, नारायणराव तमनर व आम्ही सामाजिक क्षेत्रात नेहमी बरोबर असतो, त्यांचे सामाजिक काम तसेच ते पाटबंधारे पतसंस्थेत चेअरमन राहिल्याने तेथीलही काम नेहमी आदर्शवत राहिले आहे.सरकारी क्षेत्रात नोकरी करत असून देखील सामाजिक क्षेत्रात, दूध क्षेत्रात, सरकारी क्षेत्रात त्यांचे काम चांगले आहे. एवढे बोलून दीपावलीच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या. भैरवनाथ दूध संकलन व शीतकरण केंद्राचे चेअरमन पियुष आबा शिंदे बोलताना म्हणाले की – बिरोबा दूध संकलनाचा दूधदर नेहमी सर्वांपेक्षा उच्चतम राहिला आहे. दूध उत्पादकांना हक्काचे माप नेहमी पदरात टाकण्याचा प्रयत्न यांनी केला आहे. यानंतर केशवराव शिंदे यांनी जनावरांना दिला जाणारा चारा त्यातील घटक मिळणारे दूध त्याचबरोबर नवीन संकरित गाईंचे वाण कसे तयार करावे यासंदर्भात विस्तृत माहिती उत्पादकांना दिली व दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवी मोरे म्हणाले की सध्या ओला दुष्काळ असून दूध धंदा एकमेव व्यवसाय शेतकऱ्यांकडे उरला आहे उसाचे कारखाने देखील शेतकऱ्यांना हक्काचे दर देत नाहीत, कांद्याचे दर, सोयाबीनचे दर यासाठी नेहमी संघर्ष करावा लागत आहे. दूध धंदा एकमेव उदरनिर्वाहाचा भाग झाल्याची सांगितले.
बाबासाहेब ढाकणे व अशोकराव आंधळे यांनीही दूध संकलन केंद्रातील उत्पादकांना शुभेच्छा दिल्या.तसेच विक्रम राव तांबे भाषणात म्हणाले की- नारायणराव तमनर व त्यांचे बंधू गणेश तमनर या दोघांच्या एकमेकांच्या सहकार्यातून हे संकलन केंद्र पुढे चालत असल्याचे सांगितले, नारायणराव तमनर हे पारदर्शक, सडेतोड असून नेहमी सामाजिक कामात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ते निर्व्यसनी असल्याने व्यवसायात त्याचा नेहमी चांगला फायदा होतो. मीही दूध क्षेत्रात खूप दिवसापासून आहे, सामाजिक क्षेत्रात जास्त वाहून घेतले नसते तर दूध क्षेत्रात स्वतःचे एक वेगळे स्थान राहिले असते असे सांगून दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रभाकर गाडे यांनीही उत्पादकांना शुभेच्छा दिल्या.त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष ह भ प महंत दत्तगिरी जी महाराज यांनी दूध संकलन केंद्रातील उत्पादकांचा केलेला सन्मान दिलेले पारितोषक व रिबेट म्हणून केलेले साखरेचे वाटप हा उपक्रम कौतुकास्पद असून इतर दूध संकलन केंद्रातील व्यवस्थापकांनीही यांचा आदर्श घ्यावा असे सांगून नारायणराव तमनर यांचे सामाजिक काम नेहमी इतरांच्या तुलनेत वेगळे राहिले असल्याचे नमूद केले. नारायणराव तमनर हे धार्मिक, सामाजिक,सरकारी, सहकारी, दूध क्षेत्र अशा अनेक क्षेत्रात काम करीत असल्याने त्यांना सर्व क्षेत्राचा चांगला अनुभव आहे. भविष्यातही त्यांच्या हातून असेच कार्य होण्याबाबत भावना व्यक्त केल्या व सर्व उत्पादकांना दीपावली सणाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमावेळी उत्पादक भानुदास झावरे, नानाभाऊ बाचकर, संतोष गाडे, बाळू येळे, शांताराम येळे, सोपान येळे, बबनराव शिंदे, शिवाजी थोरात, अजित थोरात, राहुल गाडे, गोरख गाडे, सर्जेराव जाधव, बाळासाहेब तमनर, सचिन गाडे, गोपी शेंडगे आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायणराव तमनर यांनी केले तर आभार नानासाहेब करमड यांनी मानले.