अहिल्यानगर
शेरी चिखलठाण येथे माजी मंत्री तनपुरेंच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमीपुजन व लोकार्पण सोहळा संपन्न
राहुरी शहर | अशोक मंडलिक : तालुक्यातील शेरी चिखलठाण येथील विविध विकास कामांचे भुमीपुजन व लोकार्पण सोहळा नुकताच माजी मंत्री आ. प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी आदिवासी कुटुंबांना शिधापत्रिका व जातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बाजार समितीचे माजी सभापती भास्करराव काळनर होते. यावेळी बोलताना आमदार तनपुरे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार असताना आपल्याकडे आदिवासी विकास खात्याच्या माध्यमातुन मतदार संघात हजारो आदिवासी कुटुंबांचे जातीचे दाखले, नविन शिधापत्रिका तसेच खावटी योजना, किराणा किट अशा अनेक योजना राबविल्या होत्या. या भागात आदिवासी कुटुंबांची संख्या जास्त आहे. येथील आदिवासी बांधवांना पुढील पिढीतील मुलांना शिक्षण घेण्यासाठी जातीच्या दाखल्याची अत्यंत गरज होती. ती या महत्वाच्या दाखल्यामुळे शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
या भागात सरकारमध्ये असताना अनेक योजना राबिवल्या. त्यामध्ये वाड्यावस्त्यांवरील रस्त्यांची अवस्था दयनीय होती. हे रस्ते आदिवासी विकास व ग्रामविकास विभागातुन तयार केले. तसेच शेतीसाठी पुरेसा विज पुरवठा पुर्ण दाबाने होत नसल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. याकरीता उर्जा खात्याच्या माध्यमातुन ५-६ नवीन ट्रान्सफार्मर बसवुन या भागातील विजेचा प्रश्न कायमचा निकाली निघल्याचे मला समाधान आहे.
यावेळी विविध रस्त्यांचे लोकार्पण व मुस्लीम समाजाचे स्मशानभुमीचे विकास कामे, हिंदु स्मशानभुमी विकास कामे तसेच ९० आदिवासी बांधवांना जातीच्या दाखल्यांचे वाटप व ६७ कुटुंबांना शिधापत्रिकेचे वाटप आमदार तनपुरे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी शेरी चिखलठाण व परीसराच्या वतीने आमदार तनपुरे यांचा सत्कार करण्यात आला.
अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या पिकांचे शेतकऱ्यांना त्वरित मदत देऊ म्हणणारे शिंदे -फडणवीस सरकारने शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसली. दीपावली संपली तरी एक कवडीही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नसल्याने चर्चा रंगली होती.
यावेळी सरपंच डॉ. सुभाष काकडे, उपसरपंच आबासाहेब काळनर, भास्कर काळनर, सखाहरी काकडे, महमंद शेख, इसाकभाई सय्यद, विनोद काळनर, विजय बाचकर, चांगदेव काकडे, गंगाधर काकडे, बाजीराव बाचकर, रघुनाथ काकडे, साहेबराव काकडे, विजय डोमाळे, ज्ञानेश्वर बाचकर, अशोक करडे, चंदु कदम, बापु जगताप, पप्पु माळवदे आदि कार्यकर्ते उपस्थीत होते. सुत्रसंचालन व आभार गंगाधर काकडे यांनी मानले.